चांदवड तालुक्यात
विद्यार्थिनीची प्रसूती
गणूर (ता. चांदवड), ता. १२ : चांदवड तालुक्यातील १४ वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीने बालिकेला जन्म दिल्याची घटना समोर आली. प्रसूतीनंतर अधिक रक्तस्त्राव झाल्याने संबंधित अल्पवयीन मुलीला आणि नवजात बालिकेला पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. नवजात बालिकेचे वजन सुमारे दोन किलो असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीला सुरुवातीला चांदवडजवळील गावातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तिला त्याच गावातील ग्रामीण रुग्णालयात आणि पुढे उपजिल्हा रुग्णालय (चांदवड) येथे दाखल करण्यात आले. प्रसूतीनंतर अधिक रक्तस्त्राव होत असल्याने माता आणि नवजात बालिकेला पुढील उपचारांसाठी नाशिकला हलविण्यात आले. या घटनेच्या अनुषंगाने पोलिस तपासाची सद्यःस्थिती आणि घटनेमागील नेमकी परिस्थिती याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे घटनेशी संबंधित कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे उचित ठरणार नाही.
दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीच्या या घटनेमुळे बालिकांचे आरोग्य, सुरक्षितता, संरक्षण आणि बालविवाह तसेच बालकांविरुद्धच्या संभाव्य गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित मुलगी आणि नवजात बालिकेला आवश्यक वैद्यकीय उपचार व संरक्षण मिळणे, तसेच सक्षम यंत्रणांकडून घटनेची वस्तुस्थिती पडताळून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही होणे महत्त्वाचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.