cyber crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: टेलिग्रामचा पार्टटाईम जॉब पडला महागात; सायबर भामट्याने घातला 34 लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Cyber Crime : सोशल मीडियाशी संबंधित ऑनलाइन पार्टटाईम जॉबच्या माध्यमातून सायबर भामट्याला एका युवकाला तब्बल ३४ लाख रुपयांचा गंडविले. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Telegrams part time job scam of 34 lakhs made by cyber scammer Nashik Cyber ​​Crime )

धनंजय केल्हे (रा. रोहित पेट्रोल पंपामागे, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, केल्हे यांच्या मोबाईलवर त्यांना पार्टटाईम जॉब करा आणि लाखो रुपये मिळवा, अशी ऑफर संशयितांनी दिली. संशयितांनी त्यांना टेलिग्राम व व्हाट्सअॅपच्या माध्यमातून वारंवार संपर्क करून पैशांचे आमिष दाखविले.

पार्टटाईम जॉब काही तासांसाठी करावा लागेल, तुम्ही तुमचा आधारकार्ड व पॅनकार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर द्या, त्यावर नोंदणी करून तुम्हाला परतावा बँक खात्यात पाठविला जाईल, असे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यासाठी त्यांना काम करण्याचा टास्क देण्यात आला. त्या टास्कमध्ये वारंवार पैसे क्रेडीट होताना दिसत असताना केल्हे यांनी आधी काही रक्कम संशयितांनी सांगितलेल्या खात्यांत भरली. २८ मार्च ते १२ एप्रिल २०२३ या कालावधीत केल्हे यांनी एकूण ३३ लाख ८५ हजार रुपये भरले.

मात्र, त्यांना पाहिजे तेवढा परतावा मिळालाच नसल्याचे समजले. विशेष म्हणजे आपलेच ३३ लाख रुपये घेऊन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांत टेलिग्राम आयडी Nita00008 व Lal10086 धारक आणि 7023967624 चे व्हॉटस्अॅप वापरकर्ता, फसवणुकीची रक्कम ज्या खात्यांवर जमा झाली त्या बँक खातेधारकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT