temperature in Nashik 
नाशिक

कधी हुडहुडी तर कधी तापमानात वाढ; नाशिककर घेतायत वातावरण बदलाचा अनुभव

अरुण मलाणी

नाशिक : गेल्‍या दोन दिवसांपूर्वी वातावरणातील शीतलहरींमुळे सायंकाळच्‍या वेळी शहरी, तसेच ग्रामीण भागात शुकशुकाट झालेला बघायला मिळाला. यानंतर तापमानातील पारा वाढल्‍याने सध्या पुन्‍हा थंडी गायब झाल्‍याची अनुभूती नाशिककरांना येऊ लागली आहे. नोव्‍हेंबर महिना संपत असताना कधी हुडहुडी तर कधी सामान्‍य वातावरण अनुभवायला मिळते आहे. यंदाच्‍या हिवाळ्यात नाशिकचे नीचांकी तापमान १०.४ अंश सेल्सियस नोंदविले असताना रविवारी (ता. २९) मात्र नीचांकी तापमान १८.२ अंश सेल्सियस नोंदविले गेले. 

नोव्‍हेंबर महिन्‍याला सुरवात झाल्‍यापासूनच वातावरणात गारवा जाणवू लागला होता. त्‍यातच गेल्‍या १२ नोव्‍हेंबरला यंदाच्‍या हंगामातील नीचांकी तापमान १०.४ अंश सेल्सियसची नोंद घेण्यात आली होती. अचानक पारा घसरल्‍याने नाशिककरांनी स्‍वेटर, मफलर, जॅकेट, शॉल असे उष्ण कपडे वापरासाठी काढलेले असताना, पुन्‍हा पारा वधारल्‍याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्‍था निर्माण होऊ लागली आहे. दुसरीकडे नाशिकच्‍या कमाल व किमान तापमानातील तफावत मात्र कमी होते आहे. उत्तर भारतातील होणारी बर्फवृष्टी लक्षात घेता येत्‍या काही दिवसांत पुन्‍हा पारा घसरणार असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे. ढगाळ वातावरण, दक्षिणेकडील वादळाची स्‍थिती यामुळे वातावरणात बदल जाणवत असल्‍याचे सांगितले जात आहे. 


काळजी घेण्याचा सल्‍ला 

वातावरणात होणाऱ्या चढ-उतारामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्‍यता अधिक असते. त्‍यामुळे अशा वातावरणात नागरिकांनी आरोग्‍याची विशेष काळजी घेण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जातो आहे. विशेषतः पहाटे व सकाळच्‍या वेळी आणि सायंकाळी वातावरणातील गारव्‍यापासून बचावासाठी उष्ण कपड्यांचा आधार घ्यावा. आहारासंबंधी पथ्यांचे पालन करण्याचाही सल्‍ला दिला जातो आहे. श्र्वसनाचे विकार असलेल्‍या नागरिकांनीदेखील आवश्‍यक त्‍या उपाययोजना करत काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. 

गेल्‍या दहा दिवसांतील वातावरणातील बदलाची स्‍थिती अशी ः 
तारीख किमान तापमान कमाल तापमान 
(अंश सेल्सियसमध्ये) (अंश सेल्सियसमध्ये) 
२० नोव्‍हेंबर १९.४ ३०.९ 
२१ नोव्‍हेंबर १५.९ ३१.१ 
२२ नोव्‍हेंबर १६.० ३१.३ 
२३ नोव्‍हेंबर १५.० ३१.३ 
२४ नोव्‍हेंबर १६.८ २९.८ 
२५ नोव्‍हेंबर १६.९ २९.८ 
२६ नोव्‍हेंबर १४.३ २९.३ 
२७ नोव्‍हेंबर १३.४ २७.२ 
२८ नोव्‍हेंबर १७.२ २६.६ 
२९ नोव्‍हेंबर १८.२ ३०.३ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संगणकतज्ज्ञ ते नासाची फेलोशिप...ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार करणारा आरोपी कोण?

CSK vs GT Live: चेन्नईची ६५ चेंडूंत एकही धाव नाही... ऋतुराज गायकवाडने वाचवली लाज... गुजरातसमोर उभं केलं सन्मानजनक लक्ष्य

Palghar Traffic : शिरसाड-वज्रेश्वरी रस्त्यावरील ३ किमी वाहतूक कोंडी; नागरिक, प्रवासी आणि भाविक त्रस्त, प्रदूषणातही मोठी वाढ

Pune Crime News: वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून; कात्रजमध्ये तीक्ष्ण शस्त्राने हल्ला

Pune Baner Crime News: बाणेरमध्ये पादचारी तरुणाला अडवून ४० हजारांची लूट; सीसीटीव्हीच्या मदतीने चौघांना पिंपरीतून अटक

SCROLL FOR NEXT