winter 
नाशिक

Nashik Winter Update: ढगाळ वातावरण 2 दिवस राहणार; मालेगावचे तापमान राज्‍यात नीचांकी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update: शहरासह जिल्‍हाभरात थंडीचा जोर वाढला असून, सकाळी दाट धुके, दिवसभर ढगाळ वातावरणासह गार वारा वाहत होता.

बुधवारी (ता. ६) मालेगावचे कमाल तापमान २५.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, राज्‍यातील हे नीचांकी तापमान आहे. (temperature of Malegaon is lowest in state nashik news)

सध्या वातावरणात गारवा जाणवत असताना दिवसभर ढगाळ वातावरण राहात असल्‍याने सूर्याचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. पुढील दोन-तीन दिवस अशाच प्रकारे ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागा‍यामार्फत वर्तविला जात आहे.

सायंकाळनंतर वातावरणात कमालीचा गारवा जाणवत होता. काही दिवसांपासून वातावरणात गारठा जाणवू लागला आहे.

तापमानात फारशी घसरण झालेली नसली तरी वातावरणात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता जाणवत आहे.

कमाल तापमानात मोठी घसरण सुरू झालेली बघायला मिळत आहे. बुधवारी (ता. ६) नाशिकचे किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २५.७ अंशापर्यत नोंदविले गेले आहे. आगामी काही दिवस तापमानात घसरण सुरूच राहण्याची शक्यता आहे. यामुळे वर्षअखेरीस थंडीचा चांगलाच तडाखा जाणवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT