Temperature Sakal
नाशिक

Summer Update : नाशिकची अवस्था विदर्भ, खानदेशाप्रमाणे

Nashik Summer Update

विक्रांत मते

नाशिक : सलग पाचव्या दिवशी चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान स्थिर राहिल्याने नाशिककरांना खानदेश, विदर्भाचा फिल येत आहे. उन्हाच्या तडाख्याने दुपारनंतर बहुतांश दुकानांचे शटर डाऊन होत असल्याचे दिसत आहे. संध्याकाळी पाचनंतर बाजारपेठेतील वातावरण पुर्ववत होताना दिसते. नागरिकदेखील टोपी, छत्री घेऊनच बाहेर पडतं आहे. (Nashik Summer Update)

गुरुवारी शहरात तिघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर डोक्यावर सावली घेऊनच शहरात नागरिक वावरताना दिसतात. हेल्मेटची सक्ती असली तरी अनेक जण हेल्मेट परिधान करतं नाही, परंतु उन्हामुळे का होईना नियमाची अंमलबजावणी होताना दिसतं आहे. थंडपेयांमध्ये पारंपरिक ताकाला मागणी वाढली असून शहरात ठिकठिकाणी ताक, मठ्ठा, लस्सी, लिंबू-सरबत, उसाचा रस विक्रीचे दुकाने थाटले आहेत. शुक्रवारी (ता. २९) सायंकाळनंतर गार हवा सुटल्याने काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, हवामान विभागाने अजून तीन दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता वर्तविल्याने नाशिकसाठी ‘हॉटेस्ट डे’ चे वातावरण कायम राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT