नाशिक : नदी वाचवा अभियांतर्गत स्‍वयंसेवकांनी श्रमदानातून संकलित केलेला कचरा esakal
नाशिक

नाशिक : 3 दिवसांत संकलित केला 10 टन कचरा

अरुण मलानी

नाशिक : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त (World Earth Day) महापालिका (nmc) आणि राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) ७ महाराष्ट्र बटालियन यांच्यातर्फे ‘नदी वाचवा’ अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्‍या तिसऱ्या दिवशी आणखी साडेचार टन कचरा संकलित केला असून, आत्तापर्यंत एकूण दहा टन कचरा संकलित करताना नदी पात्र स्‍वच्‍छ करण्यात यश आले आहे.

सातपूर आणि सिडको विभागांतर्गत असलेले मुंबई नाका नंदिनी नदी किनारा, उंटवाडी नंदिनी नदी (nandini river) किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविले. श्रमदानातून नदी स्वच्छता करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक रमेश पवार म्‍हणाले, की ‘नदी वाचवाʼ अभियान हे केवळ स्वच्छता अभियानाचा उपक्रम न राहता त्यामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे.

गोदावरी, कपिला, नंदिनी यांसारख्या नद्या स्वच्छ केल्याने शहराच्या विकासाला चालना मिळेल. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून देशसेवा घडते आहे. अभियानात नाशिक (Nashik) शहरातील विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स ७ महाराष्ट्र बटालियन, सचिन सोनवणे, सुभेदार मेजर अब्बास अली, एलटी आर. आर. शिंदे, एलटी वाय. जी. भदाणे, मेजर विक्रांत कावळे आदींसमवेत विद्यार्थी, महापालिका कर्मचारी श्रमदान करत आहेत. सलग तीन दिवसांत घंटागाडी वाहनांद्वारे सुमारे अंदाजे दहा टन कचरा संकलित करून घनकचरा प्रक्रिया केंद्र येथे रवानगी करण्यात आला आहे.

प्रत्यक्ष स्वच्छतेबरोबरच जनजागृतीकरिता संदेश देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले आहेत. उपक्रम यशस्वितेसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख नितीन धामणे, विद्युत विभागाचे उदय धर्माधिकारी, बांधकाम विभागाचे शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, विभागीय अधिकारी मयूर पाटील, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, संजय गोसावी आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी संतोष मुंडे यांनी केले. शहरातील नागरिक व युनायटेड वी स्टॅन्ड, प्लॉगर्स ग्रुप आदी सामाजिक, स्वयंसेवी संस्था, समाजसेवक यांनीही सहभाग नोंदविला.

स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन
परिसरातील सार्वजनिक ठिकाणे, नदीची स्वच्छता अबाधित राखण्याच्या दृष्टीने वेळोवेळी स्वच्छता अभियान, स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने नागरीकांना केले आहे. प्रत्येकाकडून वैयक्तिक स्तरावर राखली जाणारी स्वच्छता ही सार्वजनिक स्वच्छता अबाधित राखण्याच्‍या दृष्टीने प्रथम पाऊल असेल. त्यामुळे वैयक्‍तिक स्‍तरावरही स्‍वच्‍छता राखण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash Baramati : बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान कोसळलं

Maharashtra Teacher Promotion: शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; ‘टीईटी’ची अट कायम; ३१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

Independence Day 2026: ७९वा की ८०वा? यावर्षी भारत कितवा स्वातंत्र्यदिन साजरा करणार?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आण्णासाहेब डांगेंचा सत्कार सोहळा संपन्न

Mumbai: मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटवणार, निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार; महापालिकेची नवी उपाययोजना

SCROLL FOR NEXT