Ten-year-old girl dies of electric shock while playing badminton  Sakal
नाशिक

नाशिक : बॅडमिंटन खेळणाऱ्या चिमुरडीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

अंबादास शिंदे

नाशिक रोड : देवळालीगाव येथे सुंदर नगर मध्ये राहणाऱ्या सोनाली दिनकर निकुंभ (वय १०) या शाळेकरी बालिकेचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. बॅडमिंटन खेळत असताना वायरला अडकलेले बॅडमिंटनचे फुल काढताना विजेचा धक्का बसल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.

नेमकं घडलं काय?

याबाबत अधिक माहिती अशी की, सुदंरनगर येथील सोनाली दिनकर निकुंभ (वय १०) ही मैत्रिणी सोबत आज सायंकाळी बॅडमिंटन खेळत होती. खेळता-खेळता बॅडमिंटनचे फुल घराजवळील वीजप्रवाह असलेल्या तारेत अडकले. सोनाली आणि मैत्रिणी ने फुल काढण्यासाठी मोठी कसरत केली मात्र फुल निघेना. फुल काढण्यासाठी सोनाली घराच्या टेरेस वर जाऊन काही लांब वस्तू शोधत असतांना दुर्दैवाने तिच्या हातात लोखंडी पाईप हाती लागला, त्याने ते फुल काढत असतांना तारेतील वीज प्रवाह लोखंडी पाईप ला लागताच,सोनालीला जोरदार झटका लागलात्यात ती बेशुद्ध झाली. आजूबाजूला माहिती समजताच त्यानी सोनालीला उपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे तिला मयत घोषित केले.

घटनास्थळी नगरसेवक जगदीश पवार यांनी धाव घेतली. सोनालीचे वडील दिनकर निकुंभ यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे तर सोनाली विहितगाव मराठी शाळेत इयत्ता सहावी मध्ये शिकत होती. तिच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, आणि बहिण असा परिवार आहे. तिच्या दुर्दैवी मृत्यू ने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

Nagpur: पाण्याचे शिंतोडे उडाल्याच्या वादातून खून;कळमन्यातील घटना; दोन कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Satara Sangli Election: सातारा-सांगली निवडणुकीत मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजपला मित्रपक्षांची साथ मिळणार का?

SCROLL FOR NEXT