Girish Mahajan & Chhagan Bhujbal esakal
नाशिक

Nashik News: वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची निविदा प्रक्रिया 8 दिवसात; भुजबळांच्या प्रश्नावर महाजनांचे उत्तर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले असून, महाविद्यालयास अतिरिक्त जागेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठवला आहे.

ही जागा विद्यापीठास वर्ग करण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असून जागा हस्तांतरित होऊन प्रत्यक्षात काम कधी सुरु होणार असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता.३) सभागृहात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला.

इमारतीच्या कामाची निविदा प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण करतांना लवकरच प्रत्यक्ष कामास सुरवात होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. (Tender process for medical college building in 8 days Mahajans answer to Bhujbal question Nashik News)

आरोग्य विज्ञान विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयासाठी ३४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. या महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामाची निविदा प्रक्रिया आठ दिवसात सुरु करण्यात येईल.

ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामाला सुरवात होणार आहे. कामाला सुरवात झाल्यानंतर दीड ते दोन वर्षात हे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

Transport & Logistics Reform : देशातील वाहतूक कोंडी आणि लॉजिस्टिक्स खर्चावर तोडगा! केंद्र सरकार स्थापन करणार 'एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण'

IND vs WI, 1st T20I: नमन धीरला पदार्पणाची संधी, वैभवची निवड झाली की नाही? पाहा कशी आहे भारताची Playing XI

Marathi News Live Updates: कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून टेम्पो अडविला; दोघे ताब्यात

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SCROLL FOR NEXT