नाशिक

टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने ९ लाखांची स्पोर्टसबाईक पळवली

CD
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने ९ लाखांची बाईक पळवली सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाची फेसबुक मार्केट प्लेसवरून संपर्क साधलेल्या भामट्याने ९ लाख रुपये किमतीची महागडी स्पोर्ट्स बाईक टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने लांबवल्याची घटना घडली आहे. भाभानगर येथील सम्राट न्यूक्लीयस अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रविवारी (ता. १) सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईम नाजीम शेख (२१, रा. हुसेनी टॉवर, पखाल रोड, अशोका मार्ग) याच्या फिर्यादीनुसार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी मोहमंद हनीफ नुरुद्दीन बुरूनकर यांच्या नावे असलेली कावासाकी झेड-900 मोटारसायकल (एमएच ०८ बीएफ ११२६) विक्रीसाठी फेसबुक मार्केट प्लेसवर जाहिरात टाकली होती. रविवारी सायंकाळी फिर्यादीच्या बिल्डिंगमधील ओळखीतून वा संपर्कातून एका संशयित इसमाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार साईम शेख हे बाईक घेऊन सम्राट न्यूक्लीयस अपार्टमेंटजवळ पोहोचले. तिथे त्यांना अंदाजे २५ वर्षे वयाचा एक अनोळखी इसम भेटला. दोघांमध्ये ९ लाख ७५ हजार रुपयांत व्यवहार ठरला. संशयिताने टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असल्याचे सांगितले व टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने गेलेला इसम अर्धा तास उलटूनही परत आला नाही. फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी शोधाशोध केली, परंतु तो मिळून आला नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्याद दिली. हवालदार कुलथे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: जयकुमार गोरेंचा करिष्मा! ७५ पैकी ५३ मते घेत सातारा जिल्हा बँकेत दणदणीत विजय; अर्जुन काळेंचा दमदार प्रवेश, शेखर गोरेंना केवळ ७ मते

मोहम्मद आमीर, तू IPL 2027 मध्ये काव्या मारनच्या संघाकडून खेळणार का? पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला auction पूर्वीचा प्लान

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा! दिवाळीत पाणीकपात रद्द, MIDCचा निर्णय

Dharashiv News: भूम शहरातील नागरिकांसाठी गुड न्यूज! अनेक भागांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार; विकासकामांचे भूमिपूजन

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT