TET Exam esakal
नाशिक

TET Exam : ‘टेट’ची परीक्षा वेळापत्रकानुसारच! परिपत्रकामुळे गोंधळ, सोशल मिडीयावर अफवांचे पीक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परिषद यांच्‍यातर्फे घेतली जाणारी शिक्षक अभियोग्‍यता व बुद्धीमत्ता चाचणी (टेट) २०२२ परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्‍याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या परीक्षेसंदर्भात सोशल मिडीयावर अफवांचे पीक आले होते, दरम्‍यान टेटसाठी उद्या (ता.८) नोंदणीची अखेरची मुदत आहे. (TET exam as per schedule Confusion due to circular rumors on social media nashik news)

साधारणतः पाच वर्षांच्‍या अंतरानंतर टेट परीक्षा होत असल्‍याने अर्ज करणाऱ्या विद्यार्थी संख्येत सहाजिक वाढण्याची शक्‍यता आहे. परिक्षा परिषदेतर्फे मंगळवारी (ता.७) काढलेल्या परिपत्रकात म्‍हटले आहे, की शिक्षक अभियोग्‍यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा २२ फेब्रुवारीपासून ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

त्‍यासाठी आवेदनपत्र ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. काही उमेदवारांनी केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) दिलेली असून, या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.

या परीक्षार्थींच्या परीक्षेचा निकाल टेट-२०२२ परीक्षेच्‍या अर्जाच्‍या अंतिम मुदतीनंतर लागणार आहे. ही बाब विचारात घेऊन अशा परीक्षार्थींना टेट-२०२२ परीक्षा देण्याची संधी उपलब्‍ध होण्याकरिता परीक्षा अर्ज भरण्यास मान्‍यता दिली आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

तथापि या उमेदवारांच्‍या केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल विचारात घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार असल्‍याचे परिपत्रकात स्‍पष्ट केले आहे. दरम्यान या परीक्षेसंदर्भात न्‍यायालयात याचिका दाखल असून, निर्धारित वेळापत्रकानुसारच परीक्षा घेणार असल्‍याची भूमिका शासनाने न्‍यायालयात मांडलेली आहे. त्‍यामुळे परिक्षेच्‍या तारखेत बदल होण्याची शक्‍यता नसल्‍याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

कागदपत्रांसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत

शिक्षक अभियोग्‍यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी अर्ज करण्यास मर्यादित कालावधी आहे. त्‍यामुळे परीक्षार्थींना कागदपत्रे प्राप्त करून घेण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. ही बाब विचारात घेऊन, अशी कागदपत्रे प्राप्त करण्यासासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली जाणार असल्‍याचे स्‍प्‍ष्‍ट केलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT