thackeray group sudhakar badgujar  
नाशिक

मी आणि सलिम कुत्ता एकाच तुरुंगात होतो, पण...; सुधाकर बडगुजरांनी आरोपांवर दिले उत्तर

ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले होते. यावरुन सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे.

कार्तिक पुजारी

नाशिक- ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले होते. यावरुन सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझ्यावर राजकीय हेतूने प्रेरित गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पूर्ण माहिती न घेता हे आरोप करण्यात आले.

२०१६ मध्ये विजया राहटकर यांच्याकडून वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांच्या सभेच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले होते. यावेळी अनेक शिवसैनिकांना तुरुंगात जावं लागलं होतं. मलाही १४ ते १५ दिवस तुरुंगात जावं लागलं. तुरुंगात असताना बॉम्ब स्फोटाचे आरोपी देखील सेंट्रल जेलमध्ये होते. आरोपी कशासाठी तेथे होती याची आम्हाला काही माहिती नव्हती, असं बडगुजर म्हणाले.

राजकारणात येण्यापासून माझ्यावर कसलेही गुन्हे दाखल नव्हते. सलीम कुत्ता याचं नाव यात जोडलं जातं. त्याला १९९२-९३ मध्ये अटक झाली असेल. २०१६ मध्ये मला जेव्हा अटक झाली. तेव्हा मी नाशिक तुरुंगात कैदी होतो. तेव्हा तेथे सलीम कुत्ता देखील असेल. याचा बेबनाव किंवा मॉफिंग केलं आहे ते चुकीचं आहे, असं ते म्हणाले.

गुन्हेगार तुरुंगात असेल तर तो बाहेर कसा आला? तो पेरोलवर आल्यानंतर सार्वजनिक जीवनात राहू शकतो. अशा संदर्भात आमची काही भेट झाली असेल तर मला माहिती नाही. पण, माझा आणि त्याचा कसलाही संबंध नव्हता आणि नाही. मी तुरुंगात असताना तो तेथे होता. इतकंच मला माहिती आहे, असं बडगुजर म्हणाले.

राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत राहतात. बुद्धीबळाचा खेळ सुरुच राहतो. दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाच्या कार्यक्रमात अनेक आमदार आले होते. प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचे जॉईंट वेंचर आहे. सार्वजनिक जीवनात कुठे भेट झाली असेल तर माहिती नाही. सुषमा अंधारेंना मी सविस्तर माहिती दिली आहे. त्या या विषयी सविस्तर बोलतील, पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य केले जाईल, असं बडगुजर म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT