नाशिक

स्विकृतसाठी उबाठा, कॉंग्रेस मध्ये धुमशान

CD
टूडे साठी ------------- ‘स्वीकृत’ साठी ठाकरे सेना-काँग्रेसमध्ये धुमशान एका नावावरून धुसफूस; शिवसेनेकडून नावे गुलदस्त्यात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : न्यायालयाच्या आदेशानंतर स्वीकृत नगरसेवकपदासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपकडून तब्बल ३०० हून इच्छुकांनी फिल्डींग लावली, तर शिवसेनेमध्ये (उबाठा) जवळपास दोन नावे निश्‍चित झाले आहेत. यातील एका नावावरून पक्षात धुसफूस सुरु झाली आहे. त्यात काँग्रेसकडूनदेखील ठाकरे सेनेकडे दोनऐवजी एका जागेची मागणी केल्याने ‘मविआ’मध्ये धुमशान सुरु झाले आहे. शिवसेनेकडून अद्याप नावे गुलदस्त्यात ठेवली आहे. महापालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतरही स्वीकृत नगरसेवकपदाची घोषणा होत नसल्याने काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर प्रशासनाला स्वीकृत नगरसेवक निवडीच्या सूचना दिल्यानंतर हालचाली गतिमान झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणारे, गेल्या निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले व पराभूत होवूनही महापालिकेच्या सभागृहात येण्याची इच्छा असलेले तसेच वरिष्ठांशी जवळीक साधलेल्यांकडून फिल्डींग लावली आहे. यंदा स्वीकृत नगरसेवकांची संख्या सहावरून दहा करण्यात आली आहे. भाजपचे ७२ नगरसेवक असल्याने गुणांकानुसार सहा स्वीकृत सदस्य निवडून दिले जाणार आहे. त्याखालोखाल शिवसेनेचे दोन व ठाकरे सेनेचे दोन असे एकूण दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. काँग्रेसने ठाकरे सेनेसह गटनोंदणी केली आहे. त्यामुळे दोन्ही जागांवर ठाकरे सेनेने दावा केला आहे. त्यात दोन नावे निश्‍चित करण्यात आली आहे. यातील एक नाव वरिष्ठ नेत्याच्या मुलाचे आहे. दुसरे नाव पक्षाच्या वरिष्ठांकडून आल्यानंतर अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे, तर काँग्रेसनेदेखील गटनोंदणी एकत्र केल्याने एका जागेवर दावा केल्याने ‘मविआ’मध्ये नाराजी आहे. ठाकरे सेनेने दोन जागांवर दावा केल्याने यासंदर्भात काँग्रेसने वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. ---------चौकट----------- ५४ अर्ज वितरित २१ इच्छुकांनी थकबाकी नसल्याचे ना- हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेतले आहे. आतापर्यंत एकूण ५४ अर्ज वितरित झाले आहेत. रवींद्र गांगुर्डे, बाबासाहेब गायकवाड, चारुशीला गायकवाड, प्रमोद पाटील, संदीप लेनकर, शरद देवरे, संजय चव्हाण, रामकृष्ण कदम, गिरीश पालवे, मीनल पाटील, जगदीश पाटील, पोपट शिंदे, अमोल जाधव, मंदाकिनी जाधव, महेश महंकाळे, चंद्रशेखर पंचाक्षरी, जयप्रकाश घंटे, हेमंत गायकवाड, गौरव बच्छाव, विजय राऊत, अभिजित राऊत यांनी एनओसी घेतली आहे. -----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Gangapur News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; गंगापूरमध्ये कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Shivneri Kabaddi Tournament: अजिंक्य-साईच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची तिसऱ्या फेरीत धडक, माटुंगा वर्कशॉपचा उडवला धुव्वा

Latest Marathi News Live Update : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराला प्रतिसाद; एकनाथ शिंदेंचा दावा

SCROLL FOR NEXT