The first application in Bhadrakali for permission to sound the horn at religious place Nashik News esakal
नाशिक

Nashik | भोंग्याच्या परवानगीसाठी भद्रकालीत पहिला अर्ज

- युनूस शेख

जुने नाशिक : पोलिस आयुक्तांकडून धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी पोलिसांची परवानगी घेण्याचे आदेश पारित केले आहे. त्यानिमित्ताने भद्रकाली पोलिस ठाण्यात पहिला अर्ज दाखल झाला आहे. स्थानिक पोलिस ठाण्यामार्फत केवळ नोंदणी करून ‘ना हरकत’ (NOC) प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतरच पोलिस आयुक्तालयातून परवानगी मिळणार आहे.

पोलिस आयुक्त दीपक पांडे (CP Deepak Pande) यांनी सर्व धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी अधिकृत परवानगी घेण्याचे आदेशित केले आहे. परवानगी न घेता भोंगे लावल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यानिमित्त भद्रकाली पोलिस ठाण्यात ना हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC) बागवानपुरा भागातील कादरी मशिदीचे विश्वस्त हाजी आरिफ सय्यद यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. हा पहिलाच अर्ज असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शिवाय परवानगी पोलिस आयुक्तालयाकडून मिळणार आहे.

संबंधित पोलिस ठाण्यात केवळ ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे. हे प्रमाणपत्र जोडून आयुक्तालयात नवीन अर्ज दाखल केल्यास आयुक्तालयाकडून अधिकृत परवानगी मिळणार असल्याचे सांगण्यात आले. आयुक्तांच्या (CP) आदेशानंतर धार्मिक स्थळांचे विश्वस्त मंडळ ॲक्शन मोडमध्ये आले आहे. त्यांच्याकडून अशाप्रकारे अर्ज केले जात आहे. इतकेच काय तर छोटे-मोठे धार्मिक कार्यक्रम, पूजा करावयाची असेल तरी विश्वस्त परवानगी घेण्यासाठी येत असल्याने पोलिस आयुक्तांच्या आदेशाचा चांगलाच वचक पडला असल्याचे जाणवत आहे. भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेसह १०८ विविध धार्मिक स्थळ आहे.

असे आहे धार्मिक स्थळ

धार्मिक स्थळ संख्या (सुमारे)

मशीद २१

मंदिर ३०

दर्गा ४२

बौद्ध विहार ०२

गुरुद्वारा ०२

चर्च ०२

मदरसा( धार्मिक शिक्षण संस्था) १०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story: हरली परिस्थिती; जिंकली जिद्द...; रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावले; दयानंद मानेंची ढेबेवाडीत नव्याने भरारी !

19-minute viral video mystery: १९ मिनिटांचा व्हायरल व्हिडिओत काय? सोशल मीडियावर धुमाकूळ… शेवटी घडलं तरी काय?

Latest Marathi News Live Update : 'हाय व्होल्टेज ड्रामा' रंगलेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान

Kolhapur Friend Killed Case : कोल्हापुरात खांबाला गळा आवळून मित्राचा खून, कारण ऐकून धक्काच बसेल; मित्राला संपवून घरी निवांत झोपला पण...

Plane Service : नागपूरहून एअर इंडियाची बंगळुरू विमानसेवा सुरू

SCROLL FOR NEXT