pande cp 1.jpg
pande cp 1.jpg sakal
नाशिक

पोलिस आयुक्तांचा आदेश ठरतोय नगरसेवकांसाठी डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात होर्डिंग्ज लावताना पोलिसांची परवानगी बंधनकारक केल्याने त्याचा फटका नगरसेवकांना विकासकामांच्या जाहीरातबाजीवर होताना दिसत आहे. त्याचे पडसाद बुधवारी (ता.२०) महासभेत उमटले. महापालिकेने नियुक्त केलेल्या पोलिसांमार्फत परवानगी देवून विलंब टाळण्याची मागणी या वेळी नगरसेवकांनी केली. दोन दिवसात या विषयावर पोलिस आयुक्तांची भेट घेणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण दिले.

महापालिका क्षेत्रात होर्डिंग लावताना महापालिकेबरोबरच मजकुराच्या खात्रीसाठी पोलिसांची परवानगी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी बंधनकारक केली आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभी महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने अडीच महिन्यांवर आलेल्या निवडणुकांमुळे विकास कार्यक्रमांचे उद्‌घाटनाचा धडाका नगरसेवकांनी लावला आहे. परंतु, उद्‌घाटन कार्यक्रमाचे होर्डिंग लावताना पोलिसांची परवानगी घ्यावी लागत असल्याने त्यात विलंब होत असल्याचा मुद्दा शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे व भागवत आरोटे यांनी उपस्थित केला. भाजपचे जगदीश पाटील यांनी महापालिकेकडे वीस पोलिस व एक पोलिस उपनिरीक्षक असून, महापालिकेकडून वार्षिक वेतन अदा केले जाते. विलंब टाळण्यासाठी त्यांच्यामार्फत परवानगी देण्याची मागणी केली. महापालिकेने पोलिस आयुक्तांना पत्र लिहून पोलिसांऐवजी महापालिका आयुक्तांनी परवानगी देण्याची सूचना करण्यात आली. यासंदर्भात दोन दिवसात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन महापौर कुलकर्णी यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT