आदिवासी विकास महामंडळ sakal
नाशिक

‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

आदिवासी विकास महामंडळात बोगस नोकर भरती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आदिवासी विकास महामंडळातील बोगस नोकर भरती प्रकरणी बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणी न्यायालयात गेलेल्या ‘त्या’ उमेदवारांच्या नोकरीवर टांगती तलवार आली आहे.आदिवासी विकास महामंडळामध्ये २०१४ ते २०१६ या दरम्यान ५८४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापैकी ३७९ उमेदवार यांची निवड झाली होती. मात्र ही भरती प्रक्रिया राबवीत असताना तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव, महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांनी खासगी आयटी कंपनी ‘कुणाल’चे संचालक संतोष कोल्हे या सर्वांनी संगनमत करत आपल्या मर्जीतील उमेदवारांची भरती करत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला होता.

सदरची नोकरभरती राबवीत या अधिकाऱ्यांनी ३०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्यानंतर विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी केली. चौकशीनंतर त्यांनी सादर केलेल्या अहवालात भरती प्रक्रियेत अनियमितता झाली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे सुचविले. पाच वर्षानंतर या प्रकरणी तत्कालीन महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे, अपर आदिवासी आयुक्त अशोक लोखंडे, संतोष कोल्हे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

या भरतीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी चौकशी झाल्यानंतर १५ हून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. तर २१ कर्मचारी हे न्यायालयात गेले. यानंतर याप्रकरणी न्यायालयाकडून कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल मिळत स्थगिती मिळाली. मात्र आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच विभागाकडून या प्रकरणी न्यायालयात दाखल याचिकेच्या स्थगितीची मुदत संपल्यानंतर याचिकेला आवाहन दिले जाईल. यामुळे आता ‘त्या’ उमेदवारांच्या नोकरीवर टांगती तलवार आली आहे.

तपास रखडणार ?

महामंडळातील बोगस नोकरी भरती प्रकरणी अहवालानुसार कारवाई करण्यात आजी-माजी मंत्र्यांकडून टाळाटाळ केली जात होती. अखेर व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंगला यांनी शासन आदेशान्वये गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. परंतु या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नाकारता येणार नसल्याने या सर्वांचा नक्कीच तपासावर परिणाम होणार आहे. त्यामुळे आता पोलिस प्रशासन या प्रकरणी कशा प्रकारे तपास करतील, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT