nashik press esakal
नाशिक

नाशिक : प्रेसमधील नोटा चोरीप्रकरणात मुख्य व्यवस्थापकाची उचलबांगडी

विनोद बेदरकर

नाशिक : प्रेस मधील नोटा चोरीप्रकरणी मुख्य व्यवस्थापक एस. एल. वर्मा यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांनी गुन्हा दाखल करण्यास सहा महिन्यांचा कालावधी लावल्याने ही बदली करण्यात आली. दरम्यान, त्यांच्या जागी हैदराबाद येथील बोलेवार बाबू यांची नियुक्ती करण्यात आली असून वर्मा यांची रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट विभागाचे महाव्यवस्थापक पदी बदली झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. (theft-in-note-press-case-chief-manager-s-l-verma has-been-transferred)

गेल्या फेब्रुवारीत नोटांचे बंडल चोरीस गेल्याची तक्रार मुद्रणालय व्यवस्थापनाने १३ जुलैला दाखल केली होती. मुद्रणालयाने सहा महिने अंतर्गत तपास करूनही तपास लागला नव्हता. पोलिसांनी संबंधित विभागातील अधिकारी व कामगारांकडे चौकशी करूनही सुरवातीला काहीच माहिती मिळत नव्हती. त्यानंतर नोटा छपाईची सर्व प्रक्रिया जाणून घेत, हा बंडल सर्वांत शेवटी कोणाच्या निदर्शनास आला, याची माहिती घेतली. कटपॅक सेक्शन व पॅकिंग सेक्शनचे रेकार्ड तपासले. त्यात, हे बंडल १२ फेब्रुवारीला तपासणीसाकडून तपासले गेल्याचे दिसले. परंतु, त्याबाबत निश्‍चितता होत नसल्याने पार्सल फोडून तपासणी केली असता, त्या ठिकाणी दुसराच बंडल तपासल्याचे दिसून आले.

सीआयएसएफची सुरक्षा यंत्रणा कडक असल्याने बंडल बाहेर जाणे शक्य नव्हते. त्यानंतर पोलिसांनी कामगारांना विश्‍वासात घेतले. तरीही ठोस माहिती मिळत नव्हती. अखेर, रेकार्ड तपासले असता कटपॅकच्या दोन सुपरवायझरकडेच तपास केंद्रित झाला. त्यांनी माहिती देण्यासाठी वेळ मागितला. अखेर, कारवाईच्या भितीने शनिवारी (ता. २४) त्यांनी स्वतःहून व्यवस्थापनाला कबुली जबाब दिला. त्यानुसार हा नोटांचा बंडल चोरीस गेलेला नसून, कामाच्या लोडमध्ये पंचिंग झाला व व्यवस्थापन कारवाई करेल या भितीने ही गोष्ट कोणास सांगितली नसल्याचे पत्र व्यवस्थापनाला दिले आहे.

(theft-in-note-press-case-chief-manager-s-l-verma has-been-transferred)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT