nashik note press esakal
नाशिक

नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : चोरीचा तपास लागला, 2 निलंबीत

अंबादास शिंदे

नाशिक रोड : चलार्थपत्र मुद्रणालयातून चोरीस गेलेल्या पाच लाखांच्या नोटांच्या बंडलचा तपास लावण्यात उपनगर पोलिसांना यश आले आहे. उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. (theft-in-note-press-Two-supervisors-suspended-marathi-news-jpd93)

नोटप्रेसमधील चोरीप्रकरणी लागला छडा

वरिष्ठ निरीक्षक शिंदे म्हणाले की, गेल्या फेब्रुवारीत नोटांचे बंडल चोरीस गेल्याची तक्रार मुद्रणालय व्यवस्थापनाने १३ जुलैला दाखल केली होती. मुद्रणालयाने सहा महिने अंतर्गत तपास करूनही तपास लागला नव्हता. पोलिसांनी संबंधित विभागातील अधिकारी व कामगारांकडे चौकशी करूनही सुरवातीला काहीच माहिती मिळत नव्हती. त्यानंतर नोटा छपाईची सर्व प्रक्रिया जाणून घेत, हा बंडल सर्वांत शेवटी कोणाच्या निदर्शनास आला, याची माहिती घेतली. कटपॅक सेक्शन व पॅकिंग सेक्शनचे रेकार्ड तपासले. त्यात, हे बंडल १२ फेब्रुवारीला तपासणीसाकडून तपासला गेल्याचे दिसले. परंतु, त्याबाबत निश्‍चितता होत नसल्याने पार्सल फोडून तपासणी केली असता, त्या ठिकाणी दुसराच बंडल तपासल्याचे दिसून आले. सीआयएसएफची सुरक्षा यंत्रणा कडक असल्याने बंडल बाहेर जाणे शक्य नव्हते. त्यानंतर पोलिसांनी कामगारांना विश्‍वासात घेतले. तरीही ठोस माहिती मिळत नव्हती. अखेर, रेकार्ड तपासले असता कटपॅकच्या दोन सुपरवायझरकडेच तपास केंद्रित झाला. त्यांनी माहिती देण्यासाठी वेळ मागितला. अखेर, कारवाईच्या भितीने शनिवारी (ता. २४) त्यांनी स्वतःहून व्यवस्थापनाला कबुली जबाब दिला. त्यानुसार हा नोटांचा बंडल चोरीस गेलेला नसून, कामाच्या लोडमध्ये पंचिंग झाला व व्यवस्थापन कारवाई करेल या भितीने ही गोष्ट कोणास सांगितली नसल्याचे पत्र व्यवस्थापनाला दिले आहे.

दोन्ही सुपरवायझर निलंबीत

हे पाच लाख रुपये चोरीस गेलेले नसून, कटपॅक सेक्शनमधील दोन सुपरवायझरकडून कामाच्या व्यापात पंचिग झाल्याचे स्पष्ट झाले. या दोघांनी मुद्रणालय व्यवस्थापनाला दिलेल्या पत्राद्वारे आपली चुक मान्य केली असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, संबंधीत दोन्ही सुपरवायझरना निलंबीत करण्यात आले असून, वरिष्ठ व्यवस्थापकांना याबाबत माहिती होती काय, याचा तपास आता सुरु आहे. पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय, उपायुक्त विजय खरात, सहआयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शिंदे, कुंदन जाधव, सहाय्यक निरीक्षक संतोष खडके, अजिनाथ बटुळे, सुधीर आव्हाड, सुदर्शन बोडके, रतनसिंग नागलोथ यांनी तपास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT