crime esakal
नाशिक

Nashik Crime News : सलग 2 दिवस एकाच घरात चोरी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पिंपळचौक परिसरात एकाच घरात सलग दोन दिवस चोरी झाल्याची घटना घडली. जयश्री चंद्रकांत सांबरे यांच्या बंद घरात प्रकार घडला. घरातील हजारो रुपयांची पितळी भांडी चोरीस गेले आहे. (Theft in same house for 2 consecutive days Nashik Crime News)

भद्रकाली पिंपळ चौक येथे जयश्री सांबरे यांचे जुने घर आहे. सध्या कुटुंबीयांसह अन्य ठिकाणी वास्तव्यास आहे. जुने घर बंद असते. त्यात त्यांचे पूर्वजात जुने पितळी भांडे तसेच, काही लोकांच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहे.

शुक्रवारी(ता.२८) रात्रीच्या सुमारास बंद घरात प्रवेश करून अज्ञात संशयिताकडून चोरी करण्यात आली. घरासमोरील पत्र्याच्या डीपीवर चढून संशयितांनी घराच्या आवारात प्रवेश केला. घरातील काही भांडे चोरून नेले.

त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. भद्रकाली गुन्हेशोध पथकाने घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. दुसऱ्या दिवशी रात्रीच्या सुमारास संशयितांनी पुन्हा त्याच घरात चोरी करत अन्य भांडे आणि लोखंडी वस्तू चोरी केल्या.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पोलिसांनी परिसरातून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यात संशयित कैद झाले आहे. संशयितांमध्ये दोन मुलींचा समावेश असल्याचे फुटेजवरून स्पष्ट होत आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत आहे.

घटनास्थळावरून हाकेच्या अंतरावर भद्रकाली पोलिस ठाणे अंतर्गत त्र्यंबक पोलिस चौकी आहे. असे असताना संशयितांनी सलग दोन दिवस एकाच घरात चोरी केल्याने परिसरातील नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती राहिलेली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI technology In Agriculture : शेती सुधारण्यासाठी राज्याची ‘एआय’ योजना; तंत्रज्ञान देण्याची दोन हजार स्टार्टअप कंपन्यांची तयारी

Super Healthy Fruits: सकाळी ड्रॅगन फ्रूट खाणं का ठरतं सुपरहेल्दी? जाणून घ्या ‘ही’ 9 कारणं

Latest Marathi News Live Update : आम्ही आरोप केले तर अडचण होईल, भाजपचा अजितदादांना इशारा

पाण्याच्या टाकीत मृतदेह सडून फक्त सांगाडा उरलेला, इंदौरमध्ये दूषित पाण्याने १५ मृत्यूनंतर ३० वर्षांपूर्वीची घटना चर्चेत

High-Paying Jobs In USA: कॉलेजला म्हणा बाय-बाय, डिग्रीशिवाय मिळवा अमेरिकेत लाखों पगाराची नोकरी, जाणून घ्या कशी

SCROLL FOR NEXT