Police inspecting a cupboard broken by thieves. esakal
नाशिक

Nashik Crime News : राज्य कर्मचारी सोसायटीत धाडसी चोरी; रोख रक्कम पळविली

सातपूरच्या अशोकनगर येथील मॉडर्न हायस्कूलमागे राहणारे यश फोटो स्टुडिओचे संचालक अविनाश महाले व कुटुंबीयांच्या बंगल्यामध्ये मंगळवारी (ता. ९) रात्री धाडसी घरफोडी झाली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सातपूरच्या अशोकनगर येथील मॉडर्न हायस्कूलमागे राहणारे यश फोटो स्टुडिओचे संचालक अविनाश महाले व कुटुंबीयांच्या बंगल्यामध्ये मंगळवारी (ता. ९) रात्री धाडसी घरफोडी झाली.

यात सहा लाख रुपयांचे सोने व चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी पळविली. (theft in state employees society nashik crime news)

अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीमधील इंडियन टूल सोसायटीमध्ये राजस बंगल्यात राहात असलेल्या यश फोटोचे संचालक अविनाश महाले, सुजित महाले व त्यांचे वडील राजधर महाले कुटुंबासह राहतात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नातेवाइकांच्या लग्नानिमित्ताने संपूर्ण महाले कुटुंब गावी गेले होते.

याच दरम्यान संशयितांनी संधी साधून मंगळवारी रात्रीच्या सुमारास बंगल्याचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटाचे व ड्रॉव्हरचे कुलूप तोडून सुमारे साडेसहा लाखाचे दागिने व वीस हजार रुपये अशी रक्कम घेऊन फरारी झाले.

दरम्यान महाले कुटुंब गावावरून बंगल्याजवळ येताच बाहेर टेहेळणी करत असलेल्या संशयितांनी आतमधील चोरट्यांना खबर दिली आणि चोरट्यांनी साडेसहा लाखांचे दागिने व रोख रक्कम घेऊन शेजारील जगताप यांच्या कंपाउंडमध्ये उडी मारून फरारी झाले.

रात्री नऊपासून एक संशयित फोनवर बोलण्याचे नाटक करून बंगल्यावर नजर ठेवून टेहेळणी करत असल्याचेही निदर्शनास आल्याचे शेजारील महिलांनी सांगितले. घटनेची खबर मिळताच सातपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित घटनेचा तपास सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख व सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT