Nashik Crime News
Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : शहरात रिक्षासह 3 दुचाकींची चोरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गौरी पटांगणावर पार्क केलेली रिक्षासह शहर परिसरातून तीन दुचाकी चोरी झाल्या. दीपक कोंडाजी सूर्यवंशी (रा. सिंहस्थनगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. ३) गौरी पटांगणावर त्यांची रिक्षा पार्क केली.

काही वेळाने ते परत आले असता, त्यांची रिक्षा (एमएच- १५- एफयू- ७४३६), रिक्षात असलेले त्यांचे पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, एटीएम कार्ड असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Theft of 3 bikes including rickshaw in city Nashik Latest Crime News)

तसेच, राकेश राजेंद्र कोठुळे (रा. टाकळीरोड) यांची दुचाकी (एमएच- १५- इटी- ०१४७) सोमवारी (ता.३) दुपारी त्र्यंबक रोडवरील गोल्फ क्लब मैदानाच्या मुख्य गेटसमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संजय नरपतसिंग परमार (रा. जेलरोड) यांची दुचाकी (एमएच- १५- ईआर- ८४७५) रविवारी (ता. २) चोरी झाली.

याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल सुभाष इंगोले (रा. लोखंडे मळा, जेलरोड) यांची दुचाकी (एमएच- १५- एचए- ८२९१) २४ सप्टेंबरला चोरी झाली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : केरळमध्ये भाजपची सक्सेस स्टोरी? 'या' जागेवर मिळवली अनपेक्षित आघाडी

Baramati Lok Sabha : बारामतीत लेकीचं पारडं जड, सुनेत्रा पवार पिछाडीवर तर सुप्रिया सुळे आघाडीवर, ३४३ चा फरक

Maharashtra Lok Sabha Election Results Live : साताऱ्यात शशिकांत शिंदे 20 हजार मतांनी आघाडीवर, महायुतीचे उदयनराजे पिछाडीवर, तर विशाल पाटलांना 23 हजार मतांची आघाडी

Nagpur Crime : चिमुकलीची हत्या करणाऱ्याला तिहेरी फाशी; तिहेरी फाशीचे पहिलेच प्रकरण

Gold Price Today: आज सोने पुन्हा झाले स्वस्त; लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर सोन्यात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT