Nashik Crime News esakal
नाशिक

Crime Update : दुकान फोडून तांब्याच्या वस्तुंची चोरी

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : फाळके रोडवरील नाशिक एंटरप्राइजेस दुकान फोडल्याची (Robbery) घटना रविवारी (ता. १७) उघडकीस आली. दुकानातील तांब्याची तार आणि पट्ट्या, असा सुमारे ५० हजारांचा ऐवज चोरीला (Stolen) गेला. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Theft of copper items by breaking into shop nashik crime Latest Marathi news)

लोखंड बाजार फाळके रोडवरील सलीम लाखानी यांची हार्डवेअरची दुकान आहे. रविवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास संशयितांनी दुकानाचे शटर उचकवून आत प्रवेश केला. सुमारे ४० हजार रुपयांच्या तांब्याच्या तारांचे चार बंडल आणि १० हजारांच्या ९ तांब्याच्या पट्ट्या, अशा ५० हजारांच्या वस्तू चोरीस केल्या.

दुकानाचे शटर तुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली. भद्रकाली गुन्हेशोध पथकाने घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. दुकानाचे मालकांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर श्री. लाखानी दुकानात दाखल झाले. दुकानातील वस्तूंची तपासणी केली असता, तांब्याच्या तारांचे बंडल आणि पट्ट्या चोरीस गेल्याचे आढळून आले.

सायंकाळी श्री. लाखानी यांच्या तक्रारीवरून संशयितांविरुद्ध गुन्हा झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज मिळविले असून, त्यावरून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली. रोड फ्रंट आणि वर्दळीच्या रस्त्यावरील दुकानातून चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Crime : किरकोळ वादातून डोकं दगडानं ठेचलं, बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात १७ वर्षीय तरुणाची हत्या; २ अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

UGC NET 2025 अ‍ॅडमिट कार्ड जाहीर; 31 डिसेंबरच्या परीक्षेसाठी हॉल तिकीट 'असे' करा डाऊनलोड!

SA20: बापरे... क्रिकेट चाहत्याने पकडला तब्बल १.०८ कोटींचा कॅच! T20 सामन्यातील Video होतोय व्हायरल

सोलापूरमध्ये मोठा ट्विस्ट! काँग्रेसने तिकीट दिल्यानंतर महिला उमेदवारांचा MIM मध्ये प्रवेश, काय दिलं कारण?

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या सुनेला अटक, दीड कोटीची खंडणी घेताना रंगेहात पकडलं

SCROLL FOR NEXT