Nashik Latest crime news esakal
नाशिक

Nashik : 2 बॅटऱ्यासह डिझेलची चोरी

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्यातील मुसळगाव एमआयडीसी शिवारातून दोन बॅटऱ्या व डिझेल चोरीला (theft) गेले. एमआयडीसी शिवारात नीलकमल कंपनीजवळील चॅनल क्रमांक ३-९०० या ठिकाणी असलेल्या एक्साइड कंपनीच्या दोन व्हॅटच्या दोन बॅटऱ्या व सुमारे ९० लिटर डिझेल, असा एकूण २० हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. (Theft of diesel with 2 batteries Nashik Latest crime news)

याप्रकरणी सिक्युरिटी सुपरवायझर कैलास दौलत काकड (वय ४५, रा. पिंपरवाडी, वावी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

दुसऱ्या घटनेत सिन्नर शहरातील उगले लॉन्स परिसरातील त्रिशूळी या भागातून दिवसाढवळ्या दुचाकी लंपास झाली. मोहंमद रफीक मन्सुरी (३६, रा. त्रिशुळी पाण्याच्या टाकीजवळ) यांनी आपली दुचाकी (एमएच १५, एफपी ९३६०) दुपारी घरासमोर लावली होती.

चोरट्याने संधी साधत दुचाकी लंपास केली. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी न सापडल्याने मन्सुरी यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस नाईक आव्हाड तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT