Theft of onion worth Rs 1.25 lakh
Theft of onion worth Rs 1.25 lakh 
नाशिक

भेंडी शिवारातून सव्वा लाखाच्या कांद्याची चोरी; गुन्हा दाखल

रविंद्र पगार

नाशिक/कळवण : तालुक्यात भेंडी शिवारात एक लाख २५ हजारांच्या २५ क्विंटल कांद्याची चोरी झाल्याची घटना मंगळवारी (ता.३) रात्री घडली.  या घटनेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. राजकुमार देवरे यांनी नवी बेज व भेंडी शिवारातील शेतातील चाळीत कांदा साठवणूक केली आहे. त्यातून चोरट्यांनी कांदा लंपास केला. सध्या जिल्ह्यात चोरट्यांनी आपला मोर्चा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चाळीकडे वळविल्याने परिसरात शेतकऱ्यांची झोप पळाली आहे.

देवरे यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बुधवारी (ता. ४) सकाळी शेतातील सालदार रामदास माळी-निकम यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी ही बाब  देवरे यांना सांगितली. कांदाची चोरी झाल्यामुळे राजकुमार देवरे, मनोज देवरे, शरद देवरे, स्वप्नील भोसले यांनी देवळा, उमराणे, अभोणा, कनाशी बाजार समितीत शोध घेतला. याबाबत काहीच तपास लागला नाही. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे, पोलिस कर्मचारी बोरसे, घरटे यांनी भेट देऊन कांदा चाळीची पाहणी करून पंचनामा केला. पिक-अप वाहनातून कांदाचोरी झाल्याचा पोलिसांचा कयास असून, वाहतूक मार्गावरून माहितगार व्यक्तीकडून ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT