Political Instability esakal
नाशिक

Political Instability in State : राज्यात राजकीय अस्थिरता येणार!; ज्योतिषाचार्यांचे भाकीत

- प्रशांत कोतकर

नाशिक : सूर्यग्रहण व चंद्रग्रहण तेही पंधरा दिवसांच्या अंतरात येण्याचा योगायोग हा २९ वर्षांनी आला. या ग्रहणांचा ज्योतिष अभ्यासानुसार येत्या दोन महिन्यांत राज्यात राजकीय अस्थिरतेचा परिणाम दिसणार आहे. यात गटबाजीचा धोका हा धक्कादायक असणार असून, त्याची झळ सर्वसामान्य जनतेला बसेल, असा अंदाज ज्योतिषाचार्यांकडून व्यक्त करण्यात आला.(There will be political instability in state Predictions of Astrologers Nashik News)

देशात २९ वर्षांपूर्वी सूर्यग्रहण व चंद्रग्रहण हे पंधरा दिवसांच्या अंतरात आल्यानंतर त्याचा देशाच्या राजकारणावर परिणाम झाला होता. केंद्र सरकार अस्थिर झाले होते. त्याची झळ सर्वसामान्य जनतेला महागाई व अन्य बाबतीत चांगलीच सोसावी लागली होती. या वेळी तशा परिणामांना महाराष्ट्रातील राजकारणाला व सर्वसामान्य जनतेला सामोरे जावे लागण्याची शक्यता ज्योतिषचार्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांनी सांगितले, की दोन ग्रहणांचा हा योग २९ वर्षांनी आला आहे. हा दुर्मिळ योग असून, सामाजिक व राजकीय प्रभाव या दोन महिन्यांत राज्यात प्रामुख्याने दिसून येणार आहेत. यात गटबाजीला उधाण येऊन अस्थिरता दिसणार आहे. पक्ष फुटण्याची घटना घडण्याची शक्यता असून, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा परिणाम दिसेल.

गुंतवणुकीचे चिन्ह

राज्यात आगामी दोन महिन्यांत मोठ्या गुंतवणुकीची चिन्हे आहेत. औद्योगिक क्षेत्रात ही गुंतवणूक होईल. केंद्रांकडून एखादा प्रकल्प मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी तथा कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो. त्यामुळे कृषी क्षेत्राला दिलासासह समाधानाचे वातावरण असेल, असे ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांनी सांगितले.

"राज्यातील दोन राजकीय नेत्यांच्या आरोग्याच्या प्रश्‍नामुळे राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यात गटबाजीचा धोका मोठा आहे. या घडामोडींमुळे सर्वसामान्यांना महागाईला सामोरे जावे लागेल." -नरेंद्र धारणे, ज्योतिषाचार्य, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT