कोळगाव शिवारात चोरटा
पकडला; तिघे पसार
सकाळ वृत्तसेवा
नगरसूल, ता. ९ : कोळगाव शिवारातील (ता. येवला) गिडगे वस्तीवर दिवाळीच्या मध्यरात्री (ता. ८) चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरातून जवळपास तीन लाखांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, प्रसंगावधान राखत गिडगे कुटुंबातील तेजस या तरुणाने धाडस दाखवत एका चोरट्याला पकडले. अन्य तिघे फरारी आहेत.
कोळगाव येथील अरुण भागाजी गिडगे ममदापूर परिसरातील मुंढे वस्तीतील शेतवस्तीवर राहतात. रविवारी (ता. ८) मध्यरात्री तीनच्या सुमारास चोरट्यांनी घराचा बाजूचा दरवाजा, कडी-कोयंडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी लक्ष्मीपूजनासाठी मांडलेल्या पूजेच्या पाटावरील अडीच लाखांची रोकड, चांदीची चैन व अन्य दागिने लांबविण्याचा प्रयत्न केला.
याचवेळी चोरट्यांची चाहूल लागल्याने तेजस गिडगे याला जाग आली. त्याने प्रसंगावधान राखत पळणाऱ्या दोन चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. रोकड असलेली पिशवी हातात घेऊन जाणाऱ्या चोरट्याने तेजसला लाथ मारून झटापट करत तेथून पळ काढला. मात्र, दुसऱ्याला तेजसने घट्ट पकडून ठेवले. पंधरा ते वीस मिनिटे हा थरार सुरू होता.
आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याला दोरीने बांधून ठेवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव संशयिताला ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.