thief stole gold chain from woman neck when women gone for morning walk nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची पोत खेचली; संशयित कारमधून झाले पसार

सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने संशयिताने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबारा केला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इंदिरानगर परिसरामध्ये शनिवारी (ता. २७) रात्री एका पाठोपाठ दोन सोनसाखळी खेचल्याच्या घटना घडल्यानंतर, रविवारी (ता. २८) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने संशयिताने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबारा केला.

एरवी चोरटे दुचाकीवरून सोन्याची पोत खेचतात. परंतु या घटनेत संशयितांनी कारचा वापर केला आहे. (thief stole gold chain from woman neck when women gone for morning walk nashik crime news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जया वसंत काटे (५४, रा. चरणदास मार्केटच्या मागे, जेलरोड) या रविवारी (ता. २८) सकाळी सात वाजेच्या सुमारास घराबाहेर मॉर्निंग वॉकसाठी निघाल्या होत्या. दसककडे जाणार्या मार्गांवर त्या नेहमीप्रमाणे पायी जात असताना, एक कार त्यांच्याजवळ येऊन थांबली.

कारमधील अज्ञात संशयिताने त्यांच्याकडे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना थांबविले. पत्ता विचारण्यात गुंतवून ठेवत कारमधील संशयिताने संधी साधत त्यांच्या गळ्यातील ७५ हजारांची सोन्याची पोत बळजबरीने खेचून कारमधून नाशिकरोडच्या दिशेने पोबारा केला.

सकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर जाणार्या महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, इंदिरानगर परिसरामध्ये शनिवारी (ता.२८) दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर रविवारच्या या घटनेमध्ये संशयितांनी कारचा वापर केला आहे. नाशिकरोड पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Boat Accident : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT