car theft.jpg 
नाशिक

चापडगावच्या जावईबापूची फिरली नजर...मध्यरात्री चांगलीच झाली फजिती...अन् मग

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (चापडगाव) येथे बुधवारी (ता. २४) मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. सासुरवाडीला वास्तव्यास असलेल्या त्या तरुणाची फिरली नजर अन् लालसेपोटी केला असा प्रकार...मात्र त्याचा डाव चांगलाच उलटल्याने मात्र या जावयबापूची चांगलीच फजिती झाली.

अशी घडली घटना

बुधवारी (ता. 24) मध्यरात्रीच्या तीन वाजेच्या सुमारास चापडगाव येथील कुंभारखणी भागात राहणाऱ्या हरीदास निवृत्‍ती आव्हाड यांच्या दुचाकीचे लॉक तोडण्याचा संतोष बबनराव वायकर (वय 41 वर्षे) या संशयिताने प्रयत्न केला. तो मूळचा नांदगाव तालुक्यातील रहिवासी असून वर्षभरापूर्वी अकोले येथे सासुरवाडीला वास्तव्यास होता. मात्र, ते लॉक न तुटल्याने त्याने शेजारीच उभी असलेल्या आव्हाड यांच्या कारमध्ये प्रवेश केला. यावेळी हॉर्न वाजल्याने आव्हाड घराबाहेर आले असता पळण्याच्या तयारीत असलेला चोरटा दिसला. यावेळी चोरट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पकडून ठेवत आव्हाड यांनी आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूच्या वस्तीवरील नागरिकांनी तेथे धाव घेतली.

या तरुणास रंगेहात पकडून ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. दरम्यान पोलीस पाटील अंकुश आगिवले यांनी या घटनेबाबत वावी पोलीस ठाण्यात माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, उपनिरीक्षक काळे यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेत भायकर याला ताब्यात घेतले. त्यास दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT