नाशिक

टाके-घोटी शिवारात चाकूचा धाक दाखवत लूटमार; दोघांना अटक

पोपट गवांदे

याप्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात वाहन चालकाने मालट्रकमध्ये औषधे असल्याने प्रथम मुंबईला माल पोचवून दुसऱ्या दिवशी तक्रार दाखल केली.

इगतपुरी (नाशिक) : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर टाके-घोटी शिवारात (take ghoti area) एका ट्रकचालकाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल (mobile phone) व रोकड (money) चोरून नेत लूटमार केल्याची घटना घडली. तीन संशयितांपैकी दोघांना अटक झाली असून, एकाचा इगतपुरी पोलिस शोध घेत आहे. (Thieves have stolen a mobile phone and money from a truck driver in take ghoti area)

वाहनचालक योगेश पाटील (रा. कजगाव, जि. जळगाव) हे आपल्या वाहनाने मुंबई- नाशिक महामार्गावर गुरुवार (ता.१३) रात्री जात असता त्यांना टाके-घोटी जवळ तीन अज्ञात तरुणांनी अडवत चाकूचा धाक दाखवत, दमदाटी करून त्यांच्याकडे असलेला १२ हजार ५०० रुपयांचा मोबाईल, ३४०० रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात वाहन चालकाने मालट्रकमध्ये औषधे असल्याने प्रथम मुंबईला माल पोचवून दुसऱ्या दिवशी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सचिन म्हसणे (रा. फांगुळगव्हाण) व हनुमान आरशेंडे (रा. बोरटेंभे) या संशयितांना अटक केली. अधिक तपास निरीक्षक समाधान नागरे व सहायक निरीक्षक डी. डी. पाटील करीत आहेत.

(Thieves have stolen a mobile phone and money from a truck driver in take ghoti area)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Plant Care in Summer: कडक उन्हात बाग वाचवायची कशी? जाणून घ्या सोपे उपाय!; उन्हाळ्यात झाडांची ‘तहान’ भागवा

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

लग्नाला बोलावलं नाही म्हणून रुसलेली चाहती, रश्मिका-विजयने घरी बोलावून केला तिच्या आवडीचा 'खास' बेत, Viral Video

Dharashiv News: अवकाळी पाऊस-गारपीटीचा फटका; द्राक्ष, कलिंगड दर कोसळले; १६० रुपयांवरून ७० रुपयांवर द्राक्ष; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

SCROLL FOR NEXT