crime news esakal
नाशिक

Nashik Crime: तिकडे गावकरी रंगले सप्ताहात अन् इकडे चोरांट्यांचे 'हरी विठ्ठल'!

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : दिवसेंदिवस तालुक्यात चोरीचे प्रमाण हे वाढलेलेच आहे. दिवसाढवळ्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तालुक्यातील मुसळगाव येथे रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. (thieves robbed house while villagers in saptaha kirtan Nashik Crime)

मुसळगाव येथे गुरुवार (ता. २५) पासून अमृतमहोत्सवी सप्ताह सुरू झालेला असून या निमित्त गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. सप्ताहाचा पहिला दिवस असल्याने सकाळी महंत दौलत दास महाराज, नारायण महाराज पंढरपूरकर, स्वामी राधेश्वरानंदगिरी यांचे दर्शन व प्रवचनाचा कार्यक्रम होता.

या निमित्त गावातील संपूर्ण ग्रामस्थ सप्ताहासाठी जमले होते. दरम्यान घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर चोरट्यांनी हातसफाई केली. मुसळगाव येथील रामनाथ वामन शिरसाठ व त्यांच्या घरातील इतर सदस्य सप्ताहनिमित्त सकाळी घराला कुलूप लावून गावात गेलेले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावेळी चोरट्यांनी घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत बंद घराचे कुलूप तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त केले. लॉकर मधील अंदाजे पाच ते सहा तोळे सोन्याचे दागिने तसेच तीस हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

शिरसाठ हे दुपारी एकच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्‍यामराव निकम, श्री. गरुड, पोलिस उपनिरीक्षक वाजे, सचिन काकड, विनोद इप्पर, स्वप्नील पवार आदींनी घटनास्थळी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT