Thieves snatched elder woman bag in nashik esakal
नाशिक

भरदिवसा वृद्धेची पर्स पळवली मखमलाबाद रोडवरील प्रकार; घटना CCTVमध्ये कैद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भाजीपाला खरेदी करून घराकडे परतणाऱ्या पादचारी वृद्धेची पर्स पाठीमागून आलेल्या चोरट्याने बळजबरीने खेचून पोबारा केल्याचा प्रकार घडला. मखमलाबाद रोडवर भरदिवसा घडलेला सदरचा प्रकार एका इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.(Thieves snatching elder woman purse on Makhmalabad Road was caught on CCTV Latest Marathi News)

या घटनेमुळे ज्येष्ठांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पंचवटी पोलिसांचे गस्ती पथक या परिसरात नाही का, असा प्रश्‍न जागरूक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मंगला मुरलीधर सावंत (रा. पंचवटी) या ६३ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता.२२) सायंकाळी मखमलाबाद रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंगल कार्यालय परिसरात आल्या होत्या. भाजीपाला खरेदी केल्यानंतर सायंकाळी मखमलाबाद रोडने त्यांच्या घराकडे पायी निघाल्या होत्या.

रस्त्यावरील सेजल पार्कसमोर त्या आल्या असता, पाठीमागून टोपी घातलेला संशयित युवक आला आणि हातातील पर्स बळजबरीने हिसकावू लागला. या वेळी दोघांमध्ये झटापटही झाली. संशयिताने झटका देऊन त्यांच्या हातातील पर्स व मोबाईल हिसकावून पोबारा केला. सावंत यांनी आरडाओरडा केला. परंतु, सदर रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने संशयित पसार झाला.

पर्समध्ये ४ हजार रुपये रोख, मोबाईल व एटीएम कार्ड, असे १४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे. सदर प्रकार सेजल पार्क या इमारतीला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीतील संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिसात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस ठाणेनिहाय गस्ती पथके नेमलेले असतानाही भरदिवसा असा लुटीचा प्रकार घडल्याने पोलिसांचे गस्ती पथक करतात तरी काय, असा प्रश्‍न जागरूक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT