theft esakal
नाशिक

चोरांच्या नजरेतून मंदिरेही सुटेना; महादेव मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला

संजिव निकम

जातेगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील घाटमाथ्यावरील जातेगाव येथील डोंगरावरील श्री क्षेत्र पिनाकेश्‍वर महादेव मंदिरातील दोन दानपेट्या फोडून चोरट्यांनी त्यातील रोख रकमेवर डल्ला मारला. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

जातेगाव डोंगरावरील श्री पिनाकेश्‍वर महादेव मंदिर देवस्थान अतिप्राचीन असून, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शुक्रवारी (ता. १८) रात्री ९ ते १० च्या दरम्यान मंदिराच्या उघड्या गाभाऱ्यातील व सभामंडपातील एकूण दोन सीलबंद दानपेट्या चोरट्यांनी मंदिर परिसराबाहेर चोरुन नेऊन फोडल्या. त्यातील रोख रक्कम अंदाजे एक लाख रुपये चोरी केली. एक रिकामी दानपेटी परिसरातील १०० मीटर अंतरावर व दुसरी दानपेटी मंदिरापासून ५०० मीटर अंतरावर आढळून आली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यात दोन चोरटे मंदिरात चोरी करताना आढळून आले. पहाटे पूजा विधीसाठी आलेल्या पुजारी व भाविकांना दानपेट्यांची चोरीची झाल्याचे लक्षात आले. देवस्थानचे विश्‍वस्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पोलिस प्रशासनाला कळविल्यानंतर पोलिस निरीक्षक रामेश्‍वर गाडे, पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन घटनेची पाहणी केली. नांदगाव पोलिस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

ग्रामस्थांकडून घटनेचा निषेध

श्री क्षेत्र पिनाकेश्‍वर महादेव देवस्थानात चोरट्यांनी हेतुपुरस्कर केलेली चोरी म्हणजे आराध्य दैवतेचा व भाविकांच्या श्रद्धा, भावनेचा झालेला अपमान आहे. अशा दुष्टप्रवृत्तींचा जाहीर निषेध करण्यात येत असून, लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा करण्यात यावी, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

Solapur B-2 Land Regularization : कोटींच्या जमिनी आता दोन ते पाच हजारांत नियमित; 80 एकरांवरील पुनर्विकासाला हिरवा कंदील, सोलापूरच्या रिअल इस्टेटला मिळणार बूस्टर

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT