kalika mata  esakal
नाशिक

Navratrotsav Festival 2023: यंदा प्रथमच कालिका देवी नवरात्रोत्सव कोजागरी पौर्णिमेपर्यंत!

महिला व पुरुषांसह देणगी दर्शन पाससाठी स्वतंत्र रांगा

सकाळ वृत्तसेवा

Navratrotsav Festival 2023 : ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात यंदापासून खास भाविकांच्या मागणीवरून नवरात्रोत्सव दसऱ्याऐवजी कोजागरी पोर्णिमेपर्यंत साजरा होणार आहे. भाविकांसाठी महिला व पुरुष स्वतंत्र दर्शनरांगा असतील.

यात्रोत्सव काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

याशिवाय त्र्यंबकेश्‍वरच्या धर्तीवर तत्काळ दर्शनासाठी शंभर रुपयांत देणगी पासची सुविधा उपलब्ध केल्याचे देवस्थानच्या कार्यालयात मंगळवारी (ता.३) झालेल्या आढावा बैठकीत जाहीर केले. (This year for first time Kalika Devi Navratrotsav till Kojagari Poornima nashik)

१५ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर विश्वस्तांसह पोलिस आणि मनपा प्रशासनाची आढावा बैठक कालिका सभागृहात झाली.

बैठकीला पोलिस उपायुक्त किरण चव्हाण, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की, वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक आर. व्ही. हांडे, कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा पाटील, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजीया आदी उपस्थित होते.

या वेळी भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी दिली. यात्रोत्सव शांततेत आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त किरण चव्हाण यांनी केले.

बाहेरगावाहून येणारे तसेच बाहेरगावी जाणारे भाविक तसेच ज्या भाविकांना तत्काळ देवी दर्शन घ्यायचे असेल अशा भक्तांसाठी त्र्यंबकेश्वरच्या धर्तीवर शंभर रुपयांचा देणगी दर्शन पास सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

या भाविकांसाठी स्वतंत्र रांगा असतील याचा धर्मदर्शन रांगेमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. यंदापासून भाविकांच्या आग्रहास्तव कोजागरी पौर्णिमेपर्यंत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणारा आहे.

बहुतांशी भाविकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना यात्रोत्सव काळात होणाऱ्या गर्दीमुळे देवी दर्शन घेता येत नाही. अशा भाविकांसाठीच नवरात्रोत्सव कोजागरी पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT