Shops lined with garlands, prasad in front of Sri Bhagwati's temple steps. esakal
नाशिक

Saptashrungi Devi Temple: सप्तशृंगी गडावरून मशाली प्रज्वलीत करून मंडळे रवाना; उद्यापासून नवरात्रोत्सव

दिगंबर पाटोळे

Saptashrungi Devi Temple : आद्यस्वयंभू आदिशक्तिपीठ सप्तशृंगी गडावर रविवार (ता. १५)पासून आदिशक्तीच्या नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. गडावर व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. खानदेशासह, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, गुजरात राज्यातील हजारो मंडळे मशाली घेऊन गडावर येत आहेत.

आदिमायेच्या मंदिरातील दीपमाळेतून आपली मशाल प्रज्वलीत करून ढोलताशाच्या गजरात व आदिमायेचा जयघोष करीत आपल्या गावाकडे मशाली घेऊन धावू लागले आहेत. सप्तशृंगी गडाकडे जाणाऱ्या रस्त्यांना मशाल यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.(Thousands of groups from state are coming to saptashrungi devi gad with mashal nashik news)

सप्तशृंगी गडावर आदिमायेच्या मूर्ती संवर्धनानंतर प्रकट झालेल्या मूळ स्वरूपातील आदिमायेच्या दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यास नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस वर्षपूर्ती होत आहे. आदिमायेच्या मंदिरातील चांदीच्या नक्षीकामाच्या सजावटीसह आदिमायेचे रूप ‘याची देही याची डोळा’ आपल्या नेत्रात साठवून आई भगवती चरणी नतमस्तक होण्याची आस लाखो भाविकांनी लागली आहे.

नवरात्रोत्सव व कावड यात्रेसाठी सुमारे १० ते १२ लाख भाविक गडावर येण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने सप्तशृंगी गडावरील व्यावसायिकांसह गडाच्या मार्गावरील हॉटेल्स, पूजा साहित्य, हार विक्रेते आदींमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. दिवसभर गडावर जाणाऱ्या रस्त्यांच्या कडेला खेळणी, कटलरी दुकाने, हॉटेल्स, पूजासाहित्य, प्रसादाची दुकाने थाटण्यासाठी व्यवसायिकांची लगबग सुरू होती.

नवरात्रोत्सवात हजारो महिला घटस्थापना करतात. त्यासाठी परतीच्या पायऱ्यांजवळील भक्तांगण हॉल व होमकुंडाजवळ घटस्थापना करण्यासाठी ट्रस्टने जागा दिली आहे. घटी बसणाऱ्या महिलांनासाठी ग्रामपंचायतीने शेड बांधले आहे. रविवारी सकाळपासून नांदुरी- सप्तश्रृंगी गड रस्ता खासगी वाहानांसाठी बंद करण्यात येणार असून, या कालावधीत फक्त अधिकारी, माल वाहतुकीसाठी नोंदणी केलेली खासगी वाहानांच गडावर सोडण्यात येणार आहे.

यात्रेसाठी येणारे व्यावसायिक व भाविकांना प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी व त्यांच्याकडे आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीस दिल्या आहेत. गडावर येणाऱ्या भाविकांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या व बॉटल आणू नये व सप्तशृंगी गड स्वच्छ व प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सप्तशृंगी देवी ट्रस्ट व ग्रामपंचायतीने भाविकांना केले आहे.

गुरुवारी (ता. १२) सकाळपासूनच नगर, धुळे, औरंगाबाद, नंदुरबार, तसेच गुजरात राज्यातील २०० ते २५० किलोमीटर अंतरावरील दीडशेच्यावर नवरात्रोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आदिमायेचे दर्शन व मशाल ज्योत घेऊन गावाकडे रवाना झाले होते. शुक्रवारी (ता. १३) सायंकाळपासून नाशिक जिल्ह्यातील देवी मंडळांच्या भाविकांची रीघ लागली होती. त्यामुळे नाशिक, पिंपळगाव, कळवण आदी रस्ते मशालींच्या प्रकाशाने उजळले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT