criminal sakal
नाशिक

नांदेड : तीन जिल्ह्यांतून केले अट्टल गुन्हेगारास हद्दपार

अनेक अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला उपविभागीय दंडाधिकारी विकास माने यांनी नांदेड, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार आरोपीला शनिवारी (ता. २६) पोलिसांतर्फे नोटीस दिली आहे.

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार गणेश अमरसिंह ठाकुर (रा. गुरुनगर, करमवीरनगर नांदेड) याच्या विरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे पाठविला होता.

उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी या प्रस्तावाचा बारकाईने अभ्यास करून सदर आरोपीला नांदेड, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी विकास माने यांच्याकडे पाठविला. त्यानुसार श्री. माने यांनी गणेश अमरसिंह ठाकुर याला नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्याचा आदेश दिला.

यामुळे शहरातील अनेक गुन्हेगारी जगतामध्ये खळबळ उडाली असून, अनेक अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत. प्रस्ताव तयार करण्यासाठी पोलिस निरीक्षक एस. एम. ननवरे, सहायक पोलिस निरीक्षक बाळु गिते, बाबा गजभारे, कर्मचारी दारासिंग राठोड, दत्तात्रय गंगावरे आदींनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT