Three hundred health workers will be vaccinated on the first day in Nashik marathi news
Three hundred health workers will be vaccinated on the first day in Nashik marathi news 
नाशिक

तीनशे आरोग्य कर्मचाऱ्यांना कोव्हीशील्ड लस; पहिल्या दिवसाचे महापालिकेचे नियोजन 

विक्रांत मते

नाशिक : केंद्र सरकारच्या सुचनांनुसार शहरात शनिवार (ता. १६)पासून कोव्हीडशील्ड लसीकरणाला सुरवात होणार आहे. एका व्यक्तीला २८ दिवसांच्या अंतराने दोनदा लसीकरण करावे लागणार असल्याने त्यानुसार पहिल्या टप्प्यात ७२०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे नियोजन झाले आहे. शहरात तीन लसीकरण केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. 

महिन्याला १२ दिवस लसीकरण

केंद्र सरकारकडून सोळा१६ हजार लसी प्राप्त झाल्या असून, महापालिका मुख्यालयातील शीतपेटीत किट ठेवले आहेत. आठवड्यातून चार दिवस याप्रमाणे महिन्याला १२ दिवस लसीकरण मोहीम राबविली जाईल. एका लसीकरण केंद्रात प्रत्येकी शंभरप्रमाणे ३०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. जुने व नवीन बिटको व पंचवटी कारंजावरील इंदिरा गांधी रुग्णालयात लसीकरण होईल. केंद्रातील आरोग्य तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. १६ हजार लस किट प्राप्त झाल्या असल्या, तरी दहा टक्के गळती लक्षात घेऊन साधारण १४ हजार ४०० लस दिल्या जातील. एका व्यक्तीला दोन डोस दिले जाणार असल्याने १४, ४०० किटनुसार ७,२०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. लस टोचल्यानंतर संबंधित रुग्णाला त्रास जाणवू लागल्यास संदर्भ व मविप्रच्या मेडीकल कॉलेजमध्ये भरती केले जाणार आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT