Suicidal Death news esakal
नाशिक

Nashik : शहर परिसरात तिघांनी गळफास घेत संपविली जीवनयात्रा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी गळफास घेत जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. सातपूरच्या घाटोळ मळा परिसरात १९ वर्षाच्या युवकाने आत्महत्या केली. (Three in city ended their journey by hanging themselves Nashik Latest Marathi News)

योगेश शेषराव साठे (१९), असे मृत युवकाचे नाव आहे. योगेश याने शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राहत्या घरात साडीच्या साहाय्याने बांधून गळफास घेतला. याप्रकरणी सातपूर पोलिसात नोंद झाली आहे. दुसऱ्या घटनेत सिडकोतील इसमाने पंचवटीतील रो हाऊसच्या बांधकामाच्या ठिकाणी गळफास घेत आत्महत्या केली.

सुनील वसंत मराठे (३६, रा. सावतानगर, सिडको), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पंचवटीतील कुमावतनगरमध्ये असलेल्या भन्साळी मळ्यात रो-हाऊसचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मराठे यांनी शुक्रवारी (ता.१६) दुपारी गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तिसरी घटना सिडकोतील मोरवाडीत घडली. सुधाकर पुंडलिक सर्जेराव (६५), असे मृत व्यक्तीचे नाव असून, सर्जेराव यांनी शुक्रवारी (ता. १६) सकाळी राहत्या घरात गळफास घेतला. याप्रकरणी अंबड पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT