Accident sakal
नाशिक

नाशिक : वाहनांच्या धडकेत तिघांचा मृत्यू

धडक देऊन फरारी होणाऱ्या वाहनचालकांचा उच्छाद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - शहरात भरधाव वेगाने वाहन चालवून नागरिकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अपघातानंतर वाहनचालक साधे रुग्णालयात दाखल करण्याचे औदार्यही दाखवित नसल्याने निरपराध पादचारी व वाहनचालकांचे मृत्यूचे प्रमाणे वाढले आहे. शनिवारी (ता. १४) अशाच अपघात करून फरार झालेल्या घटनात तिघांचे मृत्यू झाले. कॉलेज रोडवर बर्गर किंग दुकानासमोर अपघातात जखमी झालेल्या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. तारा शांताराम कुलकर्णी (वय ६४, मॉडेल कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे. ताराबाई सायंकाळी साडेपाचला कॉलेज रोडवर रस्ता ओलांडत असताना, भोसला सर्कलकडून कॅनडा कॉर्नरकडे जाणाऱ्या काळ्या रंगाच्या बुलेटने जोरदार धडक दिल्याने ताराबाई गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

म्हसरूळ गावात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. अक्षय नंदू बस्ते (वय २०, शिदवंड, ता. दिंडोरी) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिंडोरी रोडवर शनिवारी (ता. १४) पावणेदोनच्या दुपारी नंदू दुचाकी (एमएच १५, इके ३८१७) वरून म्हसरुळ गावातून जात असताना, अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याच्या डोक्यातील हेल्मेट तुटून बाजूला पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक फरारी झाला. याप्रकरणी लक्ष्ण श्रीराम शिंदे (वय ३६) यांच्या तक्ररावरूनी म्हसरुळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

मॉर्निंगवॉकला जाणारेही असुरक्षित

तपोवनात चारचाकीच्या धडकेत मॉर्निंग वॉक करताना एकाचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला. नितीन बबलदास पटेल (वय ५३) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर विपीन अंबालाल पटेल (वय ५३, मैत्री बंगला, काठे गल्ली) असे जखमीचे नाव आहे. तपोवनात शनिवारी सकाळी सातच्या सुमारास पटेलद्वयी तपोवनातील लक्ष्मी नारायण पूल ओलंडून मारुती व्हेपर्स दुकानासमोरून मॉर्निंग वॉक करीत परत जात असताना, चारचाकी (एमएच १५, एचजी २०६) ने जोरदार धडक दिल्याने नितीन पटेल व बिपीन पटेल जखमी झाले. त्यांना आपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. नितीन यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT