Upper Superintendent of Police Aniket Bharti, Police Inspector Raghunath Shegar and the team seized seven mobile phones, along with cash from the mobile thieves in Sarai by the Cantonment Police team. esakal
नाशिक

Nashik Crime: अवघ्या 3 तासात तिघा मोबाईल चोरट्यांना अटक; 7 मोबाईलसह रोकड, दुचाकीही जप्त

तिघा संशयितांनी त्याला चाकूचा धाक दाखवत जिवे ठार मारण्याची धमकी देत विवो मोबाईल व एक हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरातील जुन्या महामार्गावरील पंचगंगा ऑटोसमोर एकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील नऊ हजाराचा मोबाईल व एक हजार रूपयांची रोकड लुटणाऱ्या दुचाकीवरून आलेल्या तिघा सराईत मोबाईल चोरट्यांना छावणी पोलिसांनी दुचाकी क्रमांकाच्या आधारे अवघ्या तीन तासात अटक केले.

पोलिसांनी संशयितांकडून सात मोबाईल, एक हजार रुपये रोख व दुचाकी जप्त केली आहे. (Three mobile thieves arrested in just 3 hours 7 mobiles along with cash two wheeler also seized Nashik Crime)

जुन्या महामार्गावर कृष्णा दिनेश शेठ (२५, रा. शांतीनगर, मखमलाबाद, नाशिक) हा तरुण टेम्पो उभी करून लघुशंका करीत असताना दुचाकीवर आलेल्या तिघा संशयितांनी त्याला चाकूचा धाक दाखवत जिवे ठार मारण्याची धमकी देत विवो मोबाईल व एक हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले.

संशयित दुचाकीवरुन फरार झाले. कृष्णाकडून छावणी पोलिसांनी संशयितांचे वर्णन विचारले असता त्याने मोबाईल चोरटे दुचाकीवर (एमएच ४१ बीसी ७६२०) फरार झाल्याचे सांगितले.

पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर, उपनिरीक्षक भगवान कोळी, उपनिरीक्षक सचिन चौधरी आदींनी हवालदार शरद भूषण, पोलिस नाईक प्रसाद देसले, कैलास चोथमल, शांतीलाल जगताप, किरण पाटील, संदीप राठोड आदींच्या पथकाने दुचाकी क्रमांकाच्या आधारे माहिती काढून मजहर शरिफखान (२५, रा. गुरुवार वार्ड), शहजाद अख्तर हमीद खान (१९), मोहम्मद इरफान खलील अहमद (२०, दोघे रा. गुलशेरनगर, मालेगाव) या तिघांना अटक केली.

त्याच्याजवळून सात मोबाईल, एक हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. शहर व परिसरात भरधाव दुचाकीवर येत मोबाईल चोरण्याचे प्रमाण वाढले आहे.

त्या पाश्‍र्वभूमीवर या चोरट्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी आणखी काही गुन्हे केले, की काय याचा शोध घेण्यात येत असल्याचे अप्पर पोलिस अधिक्षक भारती, निरीक्षक शेगर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT