Death News esakal
नाशिक

Nashik News: वेगवेगळ्या घटनांत तिघांच्या गळफास घेउन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर परिसरात गुरुवारी (ता. ६) वेगवेगळ्या भागात तिघांनी गळफास घेत जीवन संपविले. याप्रकरणी नाशिक रोड, म्हसरूळ व इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामनगाव रोडवरील लक्ष्मण उत्तम यादव (५५ रा. सिद्धार्थनगर, एकलहरे) यांनी गुरुवारी त्यांच्या राहत्या घरात अज्ञात कारणातून साडीने गळफास घेतला होता. ही घटना सायंकाळी उघडकीस आली.

फिटच्या आजाराने त्रस्त असलेल्या यादव यांनी आजारपणास कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात असून, याबाबत राहुल पगारे यांनी खबर दिल्याने नाशिक रोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Three people committed suicide by hanging themselves in different incidents Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुसरी घटना मखमलाबाद येथे घडली. आनंद राजेंद्र निरभवणे (३२ रा. सिद्धार्थनगर, मखमलाबाद ) यांनी लिव्हर आणि काविळीच्या आजारास कंटाळून गुरुवारी आत्महत्या केली. राहत्या घरात पंख्यास दोरी बांधून त्यांनी गळफास लावून घेतला होता.

त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत राजेंद्र निरभवणे यांनी खबर दिल्याने म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिसरी घटना पांडवलेणी भागात समोर आली.

श्याम रामदास पालवी (३० रा. वाडीचरण गौळाणे रोड, पाथर्डी शिवार) यांनी गुरुवारी पांडव लेणीच्या पाठीमागील बाजूच्या पायथ्याला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण पुढे आलेले नाही. याबाबत प्रकाश मोरे यांनी खबर दिल्याने इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT