नाशिक

धुळे जिल्हा बँकेच्या तीन जागा बिनविरोध

शिवसेना वगळून शेतकरी विकास पॅनलद्वारे सर्वपक्षीय नेते संघटित ; १७ जागांसाठी ११२ अर्ज

सकाळ वृत्तसेवा

धुळे : धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शिवसेना वगळून इतर प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलची स्थापना झाली आहे. याअंतर्गत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत बुधवारी (ता.२०) नंदुरबार जिल्ह्यातून या पॅनलच्या दोन, तर शिवसेनेची एक जागा बिनविरोध झाली. तसेच बुधवारी ३६ इच्छुकांनी विविध मतदारसंघासाठी मिळून ६२ अर्ज, तर निवडणुकीतील १७ जागांसाठी अंतिम मुदतीत एकूण ६६ इच्छुकांनी ११२ अर्ज दाखल केले.

हे तिघे झाले बिनविरोध...

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शिवसेना वगळून धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपचे नेते संघटित झाले आहेत. त्यांनी सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलची स्थापना केली आहे. यात बुधवारी या पॅनलचे उमेदवार व विविध कार्यकारी संस्था मतदारसंघातून नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यातून दीपक पाटील, तळोद्यातून भरत माळी आणि अक्कलकुव्यातून शिवसेनेचे आमशा पाडवी बिनविरोध निवडून आले आहेत. या तीन उमेदवारांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने ते बिनविरोध झाले. या स्थितीमुळे आता १४ जागांसाठी निवडणूक होईल. मात्र, निवडणूक यंत्रणेच्या निकषांप्रमाणे माघारीच्या ८ नोव्हेंबरला अंतिम दिवशी या तीन्ही उमेदवारांनी माघार घेतली नाही तर ते अधिकृतपणे बिनविरोध उमेदवार म्हणून जाहिर होतील. दरम्यान, बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलद्वारे बिनविरोध झालेले उमेदवार भरत माळी यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार केला.

या इच्छुकांनी भरले अर्ज

निवडणूक यंत्रणेकडे बुधवारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांच्या पत्नी सीमा रंधे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, माजी सभापती बाजीराव पाटील, किशोर पाटील, भरत गावित, अक्षय सोनवणे, सचिन देसले, हृषीकेश ठाकरे, दिलीप साळुंखे, राजेंद्र देसले, कमलेश देवरे या विविध पक्षांच्या इच्छुकांसह अन्य काही जणांनी निरनिराळ्या मतदारसंघांसाठी अर्ज भरले. निवडणुकींतर्गत गुरुवारी (ता.२१) सकाळी अकरापासून अर्जांची छाननी होईल. विधिग्राह्य अर्जांची प्रसिद्धी शुक्रवारी (ता.२२), तर माघारीची प्रक्रिया ८ नोव्हेंबरपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत राबविली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT