Raveena Binnar, Damini Binnar, Pranitha Binnar esakal
नाशिक

Success Story : आम्ही तिघी, बहिणी, सूनबाई अन् अधिकारी! पिंपळेच्या बिन्नर कुटुंबीयांतील भगिनींचे यश

सकाळ वृत्तसेवा

दत्तात्रेय खुळे : सकाळ वृत्तसेवा
Success Story :
ग्रामीण भागातील मुली उच्चशिक्षण घेतात, मात्र लगेच विवाह बंधनात अडकून मुली उंबरठा ओलांडला, की शिक्षण मागे पडते. परंतू उच्चशिक्षित मुलींना सासरच्या मंडळींनी पाठबळ दिले, की मुली अधिकारी पदापर्यंत पोहोचतात.

क्रांती घडते. पिंपळे (ता. सिन्नर ) येथील बबन तुकाराम बिन्नर यांच्या एकाच कुटुंबातील तीन मुली अधिकारी झाल्या आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर सासरच्या मंडळींच्या सहकार्याने तिघाही बिन्नर भगिनींनी उत्तुंग भरारी घेतली आहे. राज्याचे गृह जलसंपदा अन् महावितरण या तीन विभागांत उच्च पदावर नियुक्ती झाली आहे. (three sister daughter in law become officers Success Story of sisters from Binner family of Pimple nashik news)

पिंपळेचे बबन बिन्नर कल्याण डोंबिवली महापालिकेत शहर निर्माण शाखेत सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांना तीन मुली प्रणिता, रवीना अन दामिनी होय. या बिन्नर परिवारातील मधली मुलगी रवीना बिन्नर-करवर पहिली अधिकारी झाली आहे.

कोरोना कालावधी नंतर त्या रुजू झाल्या आहेत. दोन वर्षांपासून जुन्नरला महावितरण कंपनीत कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहे. अकोले ( जि. नगर) येथील गणेश काशिनाथ करवर यांच्या त्या पत्नी आहेत.

रविना अधिकारी झाल्यानंतर दोन्ही बहिणी प्रणिता व दामिनी यांच्या आशा उंचावल्या. त्यांना सासरच्या मंडळींनी यश गाठण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या कष्टाचे फळ सासरच्या अन् माहेरच्या दोन्ही परिवाराला मिळाले आहे.

बिन्नर परिवारातील दोघी बहिणी प्रणिता व दामिनी आज एकाच वेळी अधिकारी झाल्या आहे. त्यात थोरली मुलगी प्रणिता बिन्नर- सदगीर गृहखात्यात सायबर क्राईममध्ये असिस्टंट डायरेक्टर पदावर नियुक्ती झाली आहे. त्या राज्यात प्रथम आल्या.

डुबेरेवाडी (ता. सिन्नर) येथील शेतकरी बाजीराव किसन सदगीर यांच्या पत्नी आहे. श्री. सदगीर यांचा ओमकार नर्सरी रोप तयार करण्याचा व्यवसाय आहे. बिन्नर परिवारातील तिघी बहिणी अधिकारी झाल्या आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पण परिवार व नातेवाईकांमध्ये थोरल्या मुलींच्या पदाचा हेवा सर्वाना वाटत आहे. ते पदही मोठे आहे. प्रणिता बिन्नर संगणक प्रशिक्षणात इंजिनिअर होऊन उच्च श्रेणी पदावर अधिकारी झाल्या आहे. लहान मुलगी दामिनी बिन्नर- सदगीर जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता झाल्या आहेत.

पिंपळगाव (जि नगर) येथील व नंदुरबारचे उपजिल्हाधिकारी नितीन किसन सदगीर यांच्या पत्नी आहे. त्यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण होतील. तीन बहिणी अन् तिन्ही मुलगी असताना विवाहानंतर सूनबाई अधिकारी झाल्या आहेत, हे समाजासाठी प्रेरणादायी अन् मार्गदर्शक आहे.

"आई वडिलांनी शिकविले, सासरच्या मंडळीनी सहकार्य करून पाठबळ दिले. त्यामुळे सरळसेवा भरतीत दलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर माझी निवड झाली."

- दामिनी बिन्नर- सदगीर, कनिष्ठ अभियंता जलसंपदा विभाग.

"मी लग्नानंतर एम टेक केले. लहान बाळाला सोबत घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मुलींना आई वडील शिकवता, पण सुनेलादेखील कुटुंबांनी शिकवले पाहिजे."

- रवीना बिन्नर, कनिष्ठ अभियंता, महावितरण, जुन्नर.

"कष्टाचे फळ मिळते हेच खरे आहे. लग्नाला तेरा वर्ष झाल्यानंतर मी उच्च दर्जाच्या अधिकारी पदावर पोहोचले. कोविड काळात सासरच्यांनी मुलांचा सांभाळ केला. त्यांना मी यशाचे श्रेय देते."

- प्रणिता बिन्नर- सदगीर, असिस्टंट डायरेक्टर, सायबर क्राईम, गृहखाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st Test: टीम इंडियाकडून अडीच दिवसात वेस्ट इंडिजचा करेक्ट कार्यक्रम! मायदेशात विजयपथावर परतला आपला संघ

Shakti Cyclone : 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका? IMDचे अपडेट आले समोर

Latest Marathi News Live Update : आदिवासी आक्रमक- पोलिस स्टेशनवर दगडफेक

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा, अन् भांडण रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

Sharad Pawar : पूरग्रस्तांसाठीच्या नुकसानभरपाईचे धोरण सरकारने लवकर जाहीर करावे; शरद पवार यांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT