Police  sakal
नाशिक

Ganeshotsav 2023: गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त!

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : आजपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण व शहर पोलिस दलाने कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहर-जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

शहरात अडीच ते तीन हजार, तर जिल्ह्यात संवेदनशील ठिकाणी जादा बंदोबस्तासह जिल्हाभर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त पथकांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गणेशोत्सवकाळात होमगार्ड यांचीही मदत घेण्यात आलेली आहे. (Tight police presence in backdrop of Ganeshotsav 2023 nashik)

शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये गणेशोत्सवादरम्यान प्रत्येक मंडळांसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात ७२० सार्वजनिक मंडळांना पोलिस आयुक्तालयाकडून परवानगी देण्यात आलेली आहे.

बंदोबस्त १९ ते २९ सप्टेंबर या कालावधीसाठी राहणार आहे. गणरायाच्या प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत पोलिसांची चौकाचौकांत करडी नजर राहणार आहे. गस्ती पथकांमार्फत सातत्याने रात्र-दिवस गस्त वाढविण्यात येणार आहे.

क्यूआर कोड

शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर क्यूआर कोडिंग करण्यात आलेली आहे. गस्ती पथकांमार्फत ठराविक वेळात क्यूआर कोड स्कॅन करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणपती मंडळांसह बहुतांश ठिकाणी क्यूआर कोड लावण्यात आलेले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्ह्यातही बंदोबस्त

पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव उपविभागात अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, नाशिक उपविभागात अपर अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. यात पोलिस ठाणेनिहाय बंदोबस्त असून, संवेदनशील ठिकाणी जादा कुमक सज्ज असेल.

असा असेल शहरात बंदोबस्त

पोलिस उपायुक्त : ४

सहाय्यक आयुक्त : ८

पोलिस निरीक्षक : ४५

सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक : ११५

नवप्रविष्ट पोलिस अधिकारी : १०

पोलिस अंमलदार (पुरुष) : ७३५

पोलिस अंमलदार (महिला) : १९०

नवप्रविष्ट पुरुष : १२५

नवप्रविष्ठ महिला : १००

होमगार्ड पुरुष : ८००

होमगार्ड महिला : २५०

शीघ्रकृती दल : २

राखीव दल : १

वाहने : ६५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT