Artisans making clay lamps. esakal
नाशिक

Nashik : दिवे बनविणाऱ्यांची दिवाळीच ‘अंधारात’; कुंभार समाजावर उपासमारीची वेळ

सकाळ वृत्तसेवा

अभोणा (जि. नाशिक) : कुंभार समाज लक्ष्मीपूजनासाठी लागणारे करवे, लक्ष्मीची मूर्ती व दीपोत्सवासाठी लागणारे दिवे अतिशय मेहनतीने मातीपासून बनवतात. मात्र, सध्या बाजारपेठेत बॅटरीवर चालणारे प्लॅस्टिकचे फॅन्सी दिवे विक्रीसाठी आल्याने मातीच्या दिव्यांकडे नागरिकांनी पाठ फिरवली असल्याचे दिसते. यामुळे कुंभार समाजाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या फॅन्सी दिव्यांच्या वापरामुळे कुंभार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.

मातीच्या दिव्यांना मागणीच नसल्याने दिवे बनविणाऱ्यांचीच दिवाळी अंधारात असल्याचे चित्र आहे. कुंभार समाज बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभा आहे. या समाजाला उभारी देण्यासाठी जनतेने कुंभार समाजाने पारंपरिक पद्धतीने आकर्षकरीत्या तयार केलेल्या मातीच्या दिव्यांची खरेदी करावी, असे आवाहन कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ सोनवणे यांनी केले आहे.
मागील दोन वर्षांतील लॉकडाऊनमुळे आधीच कुंभार व्यवसाय पूर्ण ठप्प झालेला आहे.

दिवाळी सणाच्या निमित्ताने गेल्या दोन- तीन महिन्यांपासून मातीचे आकर्षक दिवे बनविण्याचे अत्यंत मेहनती काम अहोरात्र सुरू होते. मात्र, शहरांपासून ते गावापर्यंत प्लॅस्टिकच्या रंगीबेरंगी पणतीत बॅटरी, सेलवर उजळणारे एलईडी दिवे प्रत्येक दुकानात विक्रीसाठी आल्याने महागड्या तेल आणि वातींपासून सुटका म्हणून ग्राहक या फॅन्सी दिव्यांनाच पसंती दर्शवितात.

दिवसभर रस्त्यावर स्वस्त मातीचे दिवे फारसे कुणी घेताना दिसत नाही. त्यामुळे नफा तर दूरच पण मेहनत आणि खर्चही सुटणार नाही. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे.

"हातावर पोट असणाऱ्या कुंभार समाजाने तयार केलेले मातीचे दिवे सर्वांनी खरेदी करून त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी हातभार लावावा. आधीच ऑनलाईन खरेदी व बाजारात विक्रीसाठी आलेले फॅन्सी दिवे यामुळे मातीच्या पणत्यांना उठाव नाही. आपली खरेदी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकते."

- सोमनाथ सोनवणे, जिल्हाध्यक्ष, कुंभार समाज विकास समिती (महासंघ), अभोणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT