नाशिक

नऊ वर्षांपासून फरार आरोपीला सटाणा पोलिसांकडून अटक २०१७ मधील टायर चोरीचे प्रकरण; ४.६७ लाखांचा मुद्देमाल चोरीला, २.६१ लाखांचे टायर हस्तगत

CD
07461 सटाणा : संशयित खुर्शीद अब्दुल हमीद खान याला अटक केल्यानंतर पोलिस निरीक्षक योगेश पाटील, पोलिस हवालदार योगेश शेवाळे आणि समाधान कदम. टायर चोरट्याला नऊ वर्षानंतर अटक सटाणा पोलिसांची कामगिरी; मुद्देमाल हस्तगत सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता. २३ : टायर चोरीच्या गुन्ह्यात नऊ वर्षांपासून फरार असलेल्या उत्तर प्रदेशातील खुर्शीद अब्दुल हमीद खान (वय ३६) याला सटाणा पोलिसांनी अटक केली. २०१७ मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यातील संशयिताचा दीर्घकाळापासून शोध सुरू होता. सटाणा पोलिस ठाण्यात २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात संजय काशिनाथ पवार (वय ५१, रा. सन्मित्र हौसिंग सोसायटी, सटाणा) यांनी फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील इतर तीन संशयितांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. खुर्शीद अब्दुल हमीद खान आणि मोहम्मद चांद अन्सारी या आरोपीविरुद्ध २३ मे २०१७ मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. दाखल गुन्ह्यात पवार यांच्या फिर्यादीनुसार विविध प्रकारचे ११६ टायर चोरीला गेले होते. त्यांची एकूण किंमत चार लाख ६७ हजार रुपये होती. त्यापैकी ९१ टायर, अंदाजे दोन लाख ६१ हजार रुपये किमतीचे, हस्तगत करण्यात आले होते. खुर्शीद खान (वय ३६, रा. धानौरा, ता. शोहरतगड, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) याला २१ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश शेवाळे आणि शिपाई समाधान कदम यांच्या पथकाने सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : दिवाळीत फटाके उडविताना घ्या खबरदारी; अग्निशामक दलाकडून सुरक्षिततेची नियमावली

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Marathi News Live Updates: FDA चा औषध विक्रेत्यांना दणका; राज्यात २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

Shri Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या सभासद-कामगारांची दिवाळी झाली गोड! 90 कोटींच्या रकमा खात्यावर वर्ग; सभासदांना उर्वरित बिल तर कामगारांना बोनस जमा

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

SCROLL FOR NEXT