Shankar Mahadevan, Devaki Pandit, Ranjani and Gayatri singing at the 'Teertha Vitthal' event organized by Deepak Builders and Developers at Three Lives in Govindnagar on Sunday. esakal
नाशिक

Nashik News : सूर सागरामध्ये रसिक चिंब; दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची तीर्थ विठ्ठल संगीत मैफल

दीपक बिल्डर्स आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आयोजित तीर्थ विठ्ठल संगीत मैफलीचा नाशिककर रसिकांनी आस्वाद घेतला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सांज समयी सूर निरागस गगनी गुंजला अन् मंत्रमुग्ध रसिक स्वर सागरात डुंबला... निमित्त ठरले शंकर महादेवन यांच्या गायनाचे. दीपक बिल्डर्स आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आयोजित तीर्थ विठ्ठल संगीत मैफलीचा नाशिककर रसिकांनी आस्वाद घेतला.

रविवारी (ता.२८) गोविंद नगर येथील दीपक बिल्डर्सच्या थ्री लिव्ह्ज् या प्रकल्पाठिकाणी या संगीत मैफलीचे आयोजन केले होते. (Tirtha Vitthal Sangeet Concert by Deepak Builders and Developers nashik news)

याप्रसंगी देवकी पंडित, रंजनी व गायत्री यांनीही आपल्या गायनाने मैफलीत रंग भरले. प्रारंभी दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे, नाशिक सायकलिस्टचे हरीश बैजल, मनिषा रौंदळ, किशोर काळे, केवल टेंभरे व आदी मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल प्रतिमेचे पूजन व तुळशीला पाणी वाहून कार्यक्रमाचा श्री गणेशा केला.

मैफलीची सुरवात देवकी पंडित यांच्या स्वरांनी झाली. अबीर गुलाल, पंढरीचे सुख पाहता डोळा, पाहावा विठ्ठल असे अभंग सादर करत त्यांनी रसिकांना विठ्ठल भक्तीत तल्लीन केले. त्यानंतर रंजनी व गायत्री या भगिनींनी रुप पाहता लोचनी, व्यंकटाचनिलया यांसह संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, कान्होपात्रा, पुरंदरदास यांचे अभंग आपल्या स्वरांत गायले.

रसिकांना उत्कंठा होती ती शंकर महादेवन यांना ऐकण्याची... वक्रतुंड महाकाय या गणेशस्तुतीने आपल्या गायनाला सुरवात केल्यानंतर एकदंताय वक्रतुंडाय अन् शिवतांडव स्तोत्राने शंकर महादेवन यांनी मैफलीत रसिकांच्या अंगावर शहारे आणले. त्यांच्या सुरांनी आसमंतातून भक्तीरसाचा वर्षाव रसिकांवर होत होता.

कट्यार काळजात घुसलीमधील सूर निरागस हो या गीताने उपस्थितांची मने जिंकली. प्रसाद पाध्ये, आदित्य ओक, साई गिरिधर, यश आकाश, चेतन परब, सुश्मिता दवाळकर, सुखद मुंडे, सौमिल यांनी वादनाची साथसंगत दिली. स्वानंद बेदरकर यांनी निवेदन केले.

दीपक बिल्डर्सचा तीन दशकांचा प्रवास

तीर्थ विठ्ठल या संगीत मैफलीचे प्रायोजक दीपक बिल्डर्सचा ३५ वर्षांचा यशस्वी प्रवास चित्रफितीद्वारे दाखविण्यात आला. सन १९८९ ला सुरु झालेला दीपक बिल्डर्सचा प्रवास आज तीन दशकांनंतर नाशिकच्या विकासात आपला मोलाचा वाटा देत आहे. शहरात १५ पेक्षा अधिक प्रकल्पांचे निर्माण सुरु असून ५ प्रकल्प लवकरच नाशिककरांच्या भेटीला येणार असल्याची माहिती शुभ चंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT