नाशिक

वनिता विश्व महिला मंडळातर्फे

CD
‘तोच चंद्रमा नभात’ भावगीतांची मैफल ------ उपस्थितांची भरभरून दाद; वनिता विश्व महिला मंडळातर्फे आयोजन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.८ : येथील वनिता विश्व महिला मंडळातर्फे ‘तोच चंद्रमा नभात…’ या विशेष सुरेल भावगीतांच्या कार्यक्रम नुकताच झाला. रात्रीच्या चंद्रप्रकाशात मराठी व हिंदी सिनेगीत, भावगीतांच्या सुमधुर स्वरांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात ‘माय भवानी तुझे लेकुर’, ‘मेरी आवाज ही पहचान है’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘रात का समा’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘झाल्या तिन्ही सांजा’, ‘पल पल दिल के पास’, ‘गुनगुना रहे हैं भँवरे’, ‘ये समा समा है प्यार का’, ‘आ के तेरी बाहों में’, ‘दिल तो पागल है’, ‘रहे ना रहे हम’, ‘तेरे बिना जिंदगी से’, ‘हे चांदणे फुलांचें शिंपीत रात्र आली’ आणि ‘चंद्र आहे साक्षीला’ अशा लोकप्रिय गीतांची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली. विविध गीतांमधून भक्तिभाव, प्रेम, विरह, आठवणी व भावबंधांचे विविध रंग उलगडले. जुन्या अजरामर गीतांनी उपस्थितांना जुन्या आठवणींच्या विश्वात रमवले. संगीताच्या माध्यमातून मनामनांना जोडणारी ही मैफल उत्साहपूर्ण वातावरणात रंगली. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, कलाकार विद्या भंगाळे व सहकलाकार, मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य भगिनी, रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्योती साळी यांनी केले. दीपा देशपांडे यांनी आभार मानले. ---------

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

Latest Marathi News Live Update: : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली आनंददायी दिवाळी; 'नंदनवन' बंगल्यावर फराळ वाटप करत दिल्या शुभेच्छा

Siddi Community Marathi Song Viral Video : आफ्रिकन लूक अन् अस्सल मराठी गावरान ठसका; माठावर ठेका धरत सिद्दी तरुणांनी गायले ‘हिरो होंडा’ गीत

SCROLL FOR NEXT