नाशिक

आमळी भाविकांच्या गर्दीने फुलले कन्हैयालाल महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला: दर्शनासाठी रांगा

CD
(पान ४ ला मेन) AML26B00296, AML26B00294 आमळी : यंदाच्या शेवटच्या श्रावणी सोमवारी दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी. दुसऱ्या छायाचित्रात श्री. कन्हैयालाल महाराजांची मूर्ती. (छायाचित्रे : विनायक पाटील) --------- आमळी भाविकांच्या गर्दीने फुलले कन्हैयालाल महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला; दर्शनासाठी रांगा विनायक पाटील : सकाळ वृत्तसेवा आमळी, ता. ७ : येथील प्रसिद्ध श्री कन्हैयालाल महाराज मंदिरात यंदाच्या चौथ्या व शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त श्री कन्हैयालाल महाराजांच्या (विष्णू भगवान) दर्शनासाठी सोमवारी (ता. ७) पहाटेपासून राज्यासह लगतच्या गुजरात, मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी सकाळपासूनच सुरू झालेल्या रिमझिम पावसातच लांबच लांब रांगेत थांबून दर्शन घेतले. तरीही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ---------- आमळीत श्रावण महिन्यातही पावसाचे सातत्य कायम असून, अधून- मधून जोरदार सरी कोसळत असतात. आजही पावसाची तीच स्थिती होती. पावसातही भाविकांची दर्शनासाठी व नवसपूर्तीसाठी गर्दी झाली आहे. अनेक कुटुंबीय खासगी वाहनांनी दाखल झाले. ज्येष्ठांसह महिलांनी दर्शन घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी कायम होती. परिसरात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळेच पश्चिमेस दोन किलोमीटरवर असलेल्या निसर्गरम्य अलालदरीचे सौंदर्य अधिकच खुलले असून या ठिकाणी कोसळणारे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. श्रावण महिन्यात श्री. कन्हैयालाल महाराजांचे (विष्णू भगवान) दर्शन आणि बहरलेला निसर्ग सौंदर्याचा आनंद असा दुहेरी योग भाविक व पर्यटकांना साधता आला. चौथ्या व यंदाच्या शेवटच्या श्रावणी सोमवारी, तर मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. ----------- धबधब्यांनी पर्यटक सुखावले पूजेच्या साहित्यांसह विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती.तर उंच पाळणे आदी होते. मंदिर परिसरात भजन व कीर्तन सुरू होते. मंदिर परिसर तसेच गाभाऱ्यात दर्शन रांगेत मंदिर ट्रस्ट कडून सुरक्षा रक्षकांकडून गर्दीचे नियोजन केले. दर्शनानंतर भाविक निसर्गरम्य अलालदरीच्या परिसराकडे वळला. धबधबे व परिसर पाहून उपस्थित पर्यटक सुखावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

नालासोपारा शहराचे नाव बदलणार, प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार; महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल

Marathi News Live Updates: कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर कोथरूडकर एकवटले

SCROLL FOR NEXT