नाशिक

बालिका बेपत्ता प्रकरणाच्या तपासादरम्यान एकाचा मृत्यू पोलिसांनी चौकशी करून सोडले होते;वन विभागाच्या हद्दीत आढळला मृतदेह;बालिका बेपत्ता प्रकरणाशी संबंध आहे का,तपास सुरू

CD
आठ महिन्यांची बालिका बेपत्ता चौकशी झालेल्या श्रावण मोरे यांचा हद्दीत मृत्यू; कारण अस्पष्ट सकाळ वृत्तसेवा बाणगाव बुद्रुक/नांदगाव, ता. १९ : आई-वडिलांच्या शेजारी झोपलेली आठ महिन्यांची बालिका मध्यरात्री बेपत्ता झाल्यानंतर सुरू असलेल्या शोधमोहिमेदरम्यान शनिवारी (ता. १९) श्रावण दामू मोरे (वय ५५) यांचा मृतदेह वन विभागाच्या हद्दीत आढळून आला. बालिका बेपत्ता प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी मोरे यांची चौकशी केली होती. चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आठ महिन्यांची बालिका बेपत्ता झाल्याने परिसरात चिंता निर्माण झाली आहे. त्यातच तपासादरम्यान मोरे यांचा मृतदेह आढळल्याने या घटनेबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, बालिका बेपत्ता होणे आणि मोरे यांचा मृत्यू यांचा थेट संबंध असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, या दृष्टीने तपास सुरू आहे. गुरुवारी (ता. १७) रात्री साडेअकरा ते मध्यरात्रीच्या सुमारास आईला जाग आल्यानंतर मुलगी शेजारी नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कुटुंबीयांनी घरासह परिसरात शोध घेतला; मात्र रात्री उशिरापर्यंत बालिकेचा ठावठिकाणा लागला नाही. शुक्रवारी कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ आणि पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ, मनमाडचे पोलिस उपविभागीय अधिकारी रोशन पंडित, पोलिस निरीक्षक यशवंत सोळसे, पोलिस निरीक्षक विजय कारे, सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. तपासादरम्यान परिसरातील काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली. त्यात श्रावण मोरे यांचाही समावेश होता. चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले होते. शनिवारी वन विभागाच्या हद्दीत त्यांचा मृतदेह आढळून आला. मोरे यांच्या मृतदेहाचे नांदगाव येथील शासकीय रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. विच्छेदनानंतर सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूचे कारण अस्पष्ट मोरे यांच्या मृत्यूची पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आणि तपासातील निष्कर्षानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बालिका बेपत्ता प्रकरण आणि मोरे यांच्या मृत्यूचा थेट संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितलेले नाही. दोन्ही घटनांचा स्वतंत्रपणे तपास सुरू असून, संभाव्य संबंधाचाही तपास केला जात आहे. बालिकेचा अद्याप शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांची चिंता कायम आहे. पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीलाच आधार द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बाणगाव : श्रावण मोरे यांच्या विच्छेदनावेळी रुग्णालय परिसरात ठाण मांडून असलेले नातेवाईक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT