नाशिक

जळगावला स्वतंत्र रेशीम कार्यालय

CD
जळगावला स्वतंत्र रेशीम कार्यालय --- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. २४ : जिल्ह्यात तुती लागवड व कोष उत्पादन वाढल्याने जळगावला स्वतंत्र रेशीम कार्यालयाला मंजुरी मिळाली असून, तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याबाबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. राज्यात रेशीम विकासाला चालना देण्यासाठी रेशीम संचालनालयातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. सध्या पुणे प्रादेशिक विभागांतर्गत नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यातील कामकाज नाशिक जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत पाहिले जाते. तथापि, नाशिक जिल्हा रेशीम कार्यालयाकडे चार जिल्ह्यांचा वाढता कार्यभार असून, उपलब्ध मनुष्यबळ अत्यल्प असल्याने रेशीम विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात अडचणी निर्माण व्हायच्या. जळगाव जिल्ह्यात तुती लागवड व कोष उत्पादनात लक्षणीय वाढ होत असल्याने तेथे स्वतंत्र जिल्हा रेशीम कार्यालय स्थापन करणे अत्यावश्यक आहे. त्या अनुषांगाने जळगाव जिल्ह्यात स्वतंत्र रेशीम कार्यालय स्थापन करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार रेशीम संचालनालय, नागपूर याांच्या अस्थापनेवरील ३११ नियमित पदे व ५४ बाह्ययांत्रणेद्वारे द्यावायच्या सेवा असा आकृतीबंध संदर्भ क्रमांक १ च्या शासन निर्णयानुसार निश्चित केला आहे. आता जळगाव येथे नवीन जिल्हा रेशीम कार्यालय स्थापन करण्यासाठी ८ नियमित पदे व 2 पदांच्या मर्यादेत मनुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिली आहे. जळगाव येथे नवीन कार्यालयासाठी पदांना शासनाची मान्यता देण्यात आली आहे. याबाबत मंत्री संजय सावकारे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाखाली राज्यातील कृषीपूरक उद्योगांना बळकटी देण्याचे काम सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र जिल्हा रेशीम कायालयाची आवश्यकता होती. शासनाने ती पुर्ण केली असून यामुळे रेशीम व्यवसायाला नवी गती मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील व ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. रेशीम क्षेत्रातील वाढत्या सांधींचा लाभ शेतकरी व युवकांना मिळावा, उत्पादन वाढीस चालना मिळावी तसेच जळगाव जिल्हा रेशीम उत्पादनाच्या नकाशावर अधिक प्रभावीपणे उदयास यावा, यासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी विविध योजनां व्दारे भरीव निधी व सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न कायम राहील अशी ग्वाही संजय सावकारे यांनी दिली. --- कोट जळगाव जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी, युवक व उद्योजकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व दिलासादायक निर्णय आहे. - संजय सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

Eleventh Admission : अकरावी प्रवेशासाठी अंतिम संधी

CM Devendra Fadnavis : सरकार दबावाने नव्हे, संविधानानुसार चालते; जीसीसीमध्ये पुणे देशात अव्वल ठरणार

विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली, शिक्षकांनी रुग्णालयात नेण्याऐवजी आश्रमशाळेतच केला मंत्रोपचार, मेळघाटातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT