नाशिक

नाशिक रोड

CD
फोटो : B16730 नाशिक रोड : मागण्यांसाठी गुरुवारी विद्युत भवनासमोर निदर्शने करताना वीज कर्मचारी. बोनस, प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार नाशिक रोडला महावितरणसमोर वीज कर्मचाऱ्यांचे निदर्शने नाशिक रोड, ता. १५ : बोनससह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीतर्फे नाशिक रोड येथील महावितरण कार्यालयासमोर (विद्युत भवन) गुरुवारी (ता. १४) निदर्शने करण्यात आली. प्रशासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्यापूर्वी द्वारसभा घेतली आणि दिवसभर काळी फीत लावून कामकाज केले. मार्चअखेर १०० टक्के वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करूनही कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात आलेले नाही. तिन्ही कंपन्या नफ्यात असताना आणि त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले असताना बोनस त्वरित मिळावा, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. यासंदर्भात ऊर्जा अप्पर सचिव आभा शुक्ला व व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देण्यात आले आहे. ऑक्टोबरच्या संप काळातील कपात केलेले वेतन तत्काळ मिळावे, सिमकार्डची वसुली थांबवून कपात केलेली रक्कम परत मिळावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि खासगीकरण थांबवावे, सबस्टेशनवर कायमस्वरूपी ऑपरेटर नियुक्त करावे, बीआर-२०३० रद्द करून ‘एमपीआर’ मंजूर करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या द्वारसभेला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, क्रांतिकारी लाईनस्टाफ सेना व इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा पंडितराव कुमावत, किरण जाधव, सचिन पवार, हर्षद काटे, राजू पठाण, प्रशांत निकम आणि दीप्ती मोहरील यांनी आपल्या भाषणातून दिला. सतीश पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. रोहन जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT